आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराकंगना रनोट आणि अरविंद स्वामी स्टारर 'थलायवी' हा चित्रपट 10 सप्टेंबर रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाला आणि कंगनाच्या अभिनयाला प्रेक्षकांकडून दाद मिळत आहे. मात्र तरीदेखील बॉक्स ऑफिस कलेक्शननुसार हा चित्रपट अक्षय कुमारच्या 'बेल बॉटम'ला टक्कर देण्यात मागे पडला आहे.
बॉक्स ऑफिस इंडियाच्या अहवालानुसार, ए. एल विजय दिग्दर्शित थलायवी (हिंदी भाषा) ने 20-25 लाख आणि तामिळनाडू (तामिळ, तेलुगु, कन्नड आणि मल्याळम) मध्ये 80 लाख रुपयांचे ओपनिंग कलेक्शन केले आहे. यानुसार, चित्रपटाने पहिल्या दिवशी एकूण 1.25 कोटी रुपयांचे कलेक्शन केले आहे. व्यापार तज्ज्ञांना अपेक्षित होते की, चित्रपट पहिल्या दिवशी सुमारे 2 कोटी रुपयांची कमाई करेल, परंतु चित्रपट त्यांच्या अपेक्षा पूर्ण करु शकला नाही.
चित्रपटाची कमाई न होण्यामागचे मुख्य कारण म्हणजे तो देशभरातील निवडक चित्रपटगृहांमध्येच प्रदर्शित झाला. PVR आणि INOX आणि सिनेपोलिसने उत्तर भारतात कंगनाचा चित्रपट प्रदर्शित करण्यास नकार दिला होता. चित्रपट रिलीज न करण्यामागेच कारण असे होते की, हा चित्रपट रिलीज झाल्यानंतर फक्त दोन आठवड्यांतच ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होत आहे.
हा चित्रपट नेटफ्लिक्सवर हिंदीत आणि अमेझॉन प्राइमवर तामिळ, तेलुगू, कन्नड आणि मल्याळम भाषांमध्ये रिलीज होईल. रिपोर्टनुसार, चित्रपटाचे ओटीटी अधिकार 55 कोटी रुपयांना विकले गेले आहेत.
'बेल बॉटम' आणि 'चेहरे'च्या तुलनेत पिछाडीवर राहिला 'थलायवी'
चित्रपटगृहे उघडल्यानंतर सर्वप्रथम प्रदर्शित होणारा चित्रपट हा बेल बॉटम आहे. यात अक्षय कुमार, वाणी कपूर, हुमा कुरैशी, लारा दत्ता यांच्या मुख्य भूमिका आहेत. चित्रपटाने पहिल्या दिवशी 2.75 कोटींचा व्यवसाय केला होता. तर कंगनाचा चित्रपट अनेक भाषांमध्ये प्रदर्शित होऊनही बेल बॉटमच्या तुलनेत अर्धी कमाईदेखील करू शकलेला नाही. तर चेहरे या चित्रपटाने पहिल्या दिवशी 40 लाखांची कमाई केली होती. तर थलायवीने हिंदीत केवळ 20-25 लाखांची कमाईलकेली आहे.
10 सप्टेंबर रोजी रिलीज झालेला 'थलायवी' हा चित्रपट दिवंगत माजी अभिनेत्री आणि तामिळनाडूच्या माजी मुख्यमंत्री जे जयललिता यांचा बायोपिक आहे. चित्रपटात कंगना रनोटने जयललितांची भूमिका साकारली आहे, तर अरविंद स्वामी एमजीआरच्या भूमिकेत आहे. ए. एल विजय दिग्दर्शित या चित्रपटातील कंगनाच्या अभिनयाला चांगलीच पसंती मिळत आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.