आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांवर चौथ्यांदा आपली छाप सोडणाऱ्या अभिनेत्री कंनगना रनोटचा आज वाढदिवस आहे. आजच्या दिवशी कंगनाने आपल्या चाहत्यांसाठी आपल्या आगामी बहुप्रतिक्षीत 'थलैवी' चित्रपटाचा ट्रेलर भेटीला आणला आहे.
'थलैवी' हा अभिनेत्री आणि तामिळनाडूच्या माजी मुख्यमंत्री दिवंगत जयललिता यांच्या आयुष्यावर आधारित चित्रपट आहे. या चित्रपटाची मागील अनेक दिवसांपासून चर्चा सुरू होती. आज अखेर कंगनाने आपल्या वाढदिवशी चाहत्यांसाठी ट्रेलर रिलीज केला. यात कंगनाचा हटके अंदाज दिसून येत आहे.
'थलैवी'चे ट्रेलर
तीन मिनिटे 22 सेकंदचे ट्रेलर असून, चित्रपटात जयललिता यांचे चित्रपटसृष्टीतील आणि त्यानंतर प्रभावी राजकारणी म्हणून ओळख निर्माण करण्यापर्यंतचा प्रवास दाखवण्यात आला आहे. या ट्रेलरने सोशल मीडियावर धुमाकूळ घातला असून, कंगनाच्या अभिनयाचे कौतुक केले जात आहे.
अभिनेत्री आणि तामिळनाडूच्या माजी मुख्यमंत्री जयललिता यांच्या आयुष्यावर आधारित 'थलैवी' मध्ये कंगनासोबतच अभिनेता अरविंद स्वामी, भाग्यश्री, राज अर्जुन आणि मधु बालाने प्रमुख भूमिका साकारल्या आहेत. अरविंद स्वामीने यात अभिनेते आणि तामिळनाडूचे माजी मुख्यमंत्री दिवंगत एमजीआर यांची भूमिका साकारली आहे. चित्रपटाचे दिग्दर्शन विजयने केले असून, विष्णु वर्धन इंदुरी आणि शैलेश आर सिंहने चित्रपटाची निर्मीती केली आहे. चित्रपट या वर्षी 23 एप्रिलला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.