आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

48 वर्षांचा झाला विजय:आई 100 रुपये कमावायची तेव्हा एकवेळ खायला मिळायचे, आज आहे 420 कोटींच्या संपत्तीचा मालक

4 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • जाणून घेऊया साउथ सिनेसृष्टीतील या सुपरस्टारच्या वाढदिवसानिमित्त त्याचा आतापर्यंतचा प्रवास...

साऊथचा सुपरस्टार थलपती विजय आज 48 वर्षांचा झाला आहे. विजय हा साउथ फिल्म इंडस्ट्रीचा सुपरस्टार आहे, त्याने 'बीस्ट', 'मास्टर'सारखे अनेक सुपरहिट चित्रपट केले आहेत. आज इंडस्ट्रीतील सर्वाधिक मानधन घेतलेल्या अभिनेत्यांपैकी एक असलेल्या विजयला त्याच्या पहिल्या चित्रपटासाठी 500 रुपये मानधन मिळाले होते. विजयने वयाच्या 10 व्या वर्षी 'वेत्री' या चित्रपटातून आपल्या करिअरची सुरुवात केली. त्यानंतर त्याने वयाच्या 18 व्या वर्षी मुख्य अभिनेता म्हणून 'नालया थीरपू' या चित्रपटातून काम करण्यास सुरुवात केली. विजयने आतापर्यंत 65 चित्रपट मुख्य भूमिका साकारल्या आहेत. फोर्ब्सच्या यादीतही विजयचे नाव अनेकदा आले आहे. चला तर मग जाणून घेऊया साउथ सिनेसृष्टीतील या सुपरस्टारच्या वाढदिवसानिमित्त त्याचा आतापर्यंतचा प्रवास...

गरिबीत गेले बालपण

जोसेफ विजय चंद्रशेखरचा जन्म 22 जून 1974 रोजी मद्रास येथे झाला. त्याचे वडील एस. ए चंद्रशेखर हे तामिळ चित्रपट दिग्दर्शक होते तर त्याची आई शोभा चंद्रशेखर पार्श्वगायिका होत्या. पण त्याचे वडील चित्रपट दिग्दर्शक असतानाही, विजयने असा काळही पाहिला जेव्हा त्याची आई शोभा पार्श्वगायनातून दिवसाला 100 रुपये कमवत असे, ज्यामुळे त्याच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालत असे. ज्या दिवशी त्याच्या आईला काम मिळत नसे, त्यादिवशी विजयच्या कुटुंबीयांना उपाशीपोटी झोपावे लागायचे. एके अचानक विजयचे जग बदलले, त्याची बहीण विद्या हिचे वयाच्या अवघ्या 2 व्या वर्षी निधन झाले. विजयच्या आईच्या म्हणण्यानुसार, विजय लहानपणी खूप खोडकरपणा होता, पण त्याची बहीण विद्या हिच्या मृत्यूनंतर विजय शांत आणि उदास राहू लागला होता.

पहिल्या चित्रपटासाठी मिळाले होते 500 रुपये

विजयच्या करिअरची सुरुवात वयाच्या 10 व्या वर्षी 1984 मध्ये आलेल्या वैत्री या चित्रपटातून झाली. या चित्रपटात विजयने बालकलाकार म्हणून काम केले होते, ज्यासाठी त्याला 500 रुपये फी म्हणून देण्यात आली होती.विजयने आपल्या वडिलांच्या 15 चित्रपटांमध्ये काम केले आहे, त्यापैकी सहा चित्रपटांमध्ये तो बाल कलाकार म्हणून झळकला.

वयाच्या 18 व्या वर्षी मिळाला होता पहिला लीड रोल

विजयला त्याच्या वडिलांनी दिग्दर्शित केलेल्या 'नलैया थिरपू' या चित्रपटात पहिल्यांदाच मुख्य अभिनेता म्हणून काम करण्याची संधी मिळाली. त्याचे वडील या चित्रपटाचे दिग्दर्शक होते. हा चित्रपट 1992 मध्ये प्रदर्शित झाला, पण हा चित्रपट फारसा चालला नाही. या चित्रपटातील त्याचे नाव विजय होते. याच नावाने त्याने 8 चित्रपटांत काम केले आहे. पण त्यानंतर विजयने एकामागून एक तीन हिट चित्रपट देऊन सर्वांची बोलती बंद केली. त्यानंतर 1992 मध्ये त्याचा सेंधुरापंडी हा चित्रपट प्रदर्शित झाला, या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली. त्यानंतर 1994 मध्ये आलेल्या 'रसीगन' चित्रपटातून तो आणखी लोकप्रिय झाला. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली होती. या चित्रपटानंतर विजयने अनेक हिट चित्रपट दिले.

चाहतीसोबत थाटले लग्न
विजय चेन्नईमध्ये त्याच्या चित्रपटाचे शूटिंग करत होता. त्यावेळी त्याची पत्नी संगीता यूकेमध्ये राहत होती आणि ती खूप मोठी चाहती होती. एके दिवशी संगीता विजयला भेटायला त्याच्या सेटवर पोहोचली आणि त्याच्या आगामी चित्रपटासाठी त्याला शुभेच्छा दिल्या. दोघांनी आपापले फोन नंबर एकमेकांना शेअर केले आणि येथूनच त्यांच्यात प्रेमांकुर फुलले. दोघांनीही लग्नाआधी जवळपास 3 वर्षे एकमेकांना डेट केले होते. त्यानंतर एके दिवशी विजयच्या वडिलांनी संगीताला आपल्या घरी बोलावून विजयचा लग्नाचा प्रस्ताव ठेवला. मग काय संगीताने होकार दिला. संगीताचे वडील तामिळ व्यापारी होते, त्यांनीही या लग्नासाठी होकार दिला. दोघांचा धर्म वेगळा असल्याने कोणत्या धर्मात लग्न करायचे हे ठरवणे कठीण होत होते. मग विजयने ठरवले की संगीताचा हिंदू धर्मावर विश्वास आहे तर हिंदू धर्मानुसार लग्न करावे. 25 ऑगस्ट 1999 रोजी दोघांचे लग्न झाले. आता दोघांना दोन मुले आहेत.

100 कोटी फी घेऊन रजनीकांत यांना मागे टाकले
विजय हा सर्वाधिक मानधन घेणारा तामिळ अभिनेता आहे. त्याने ‘थलापती 65’ या चित्रपटासाठी तब्बल 100 कोटींचे मानधन घेतले आहे. मानधनात त्याने रजनीकांत यांनाही मागे टाकले आहे. रजनीकांत यांनी ‘दरबार’ साठी 90 कोटी रुपये घेतले होते.

65 चित्रपटांमध्ये काम केले
थलपती विजय याने आतापर्यंत 65 चित्रपटांमध्ये काम केले आहे, त्यापैकी त्याचे बहुतांश चित्रपट हिट ठरले आहेत. कथ्थी, मास्टर, थेरी हे चित्रपट त्याच्या उत्कृष्ट अभिनयासाठी ओळखला जातो.

एकूण 420 कोटी रुपयांची आहे संपत्ती
मीडिया रिपोर्ट्सनुसार, थलापती विजयची एकूण संपत्ती 420 कोटी आहे. विजय लग्झरी लाइफ जगतो. विजयची वार्षिक कमाई 100 ते 120 कोटींपर्यंत आहे. तो अनेक मोठ्या कंपन्यांच्या जाहिराती करतो. त्याच्याकडे अनेक आलिशान गाड्यांचे कलेक्शन आहे. विजय सध्या चेन्नईतील एका आलिशान बंगल्यात कुटुंबासह राहतो.

गायकसुद्धा आहे विजय
आपली आई शोभा चंद्रशेखर यांच्याप्रमाणेच विजय देखील एक उत्तम गायक आहे. 'थुपक्की' या चित्रपटात त्याने गायलेले 'गूगल गूगल' हे गाणे खूप लोकप्रिय झाले होते. या गाण्यासाठी विजयने सर्वाधिक लोकप्रिय तामिळ गाण्याचा पुरस्कारही आपल्या नावी केला होता.

'थलापथी 66'

सध्या विजय त्याच्या आगामी 'थलपथी 66' या चित्रपटाच्या तयारीत व्यस्त आहे. हा चित्रपट 2023 मध्ये प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात विजयसोबत रश्मिका मंदाना दिसणार आहे.

बातम्या आणखी आहेत...