आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करा'मास्टर' या चित्रपटातील मुख्य अभिनेता आणि दाक्षिणात्य सुपरस्टार थलापती विजयने आपल्या आई- वडिलांसह 11 जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. अशा पद्धतीने आपल्याच आई-वडिलांविरोधात कोर्टात याचिका दाखल करण्याच्या विजयच्या भूमिकेमुळे सर्वचजण हैराण झाले आहेत. वृत्तानुसार अभिनेता थलापती विजयने आपल्या आई-वडिलांसह अन्य 11 लोकांविरोधात मद्रास उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे.
राजकारणावरुन कुटुंबात वाद
आपल्या याचिकेत विजयने म्हटले, 'वडील एस. ए. चंद्रशेखर, आई शोबा यांच्यासह 11 लोक माझ्या नावाचा वापर करुन कोणत्याही स्वरुपाच्या सभेचे आयोजन किंवा गर्दी गोळा करता कामा नये.' या प्रकरणाची पुढील सुनावणी न्यायालयाने 27 सप्टेंबर रोजी ठेवली आहे. अभिनेता विजय याने आपल्या आई-वडिलांसह 11 लोकांविरोधात दाखल केलेल्या याचिकेत म्हटले आहे की, जर त्याच्या नावाचा वापर करुन कोणतीही बैठक किंवा सभा आयोजित करण्यात येत असेल तर न्यायालयाने त्यावर प्रतिबंध आणावे.'
लग्झरी कारचा कर न भरल्याने चर्चेत आला होता विजय
2012 मध्ये सुपरस्टार विजयने इंग्लंडमधून आयात केलेली एक महागडी कार खरेदी केली होती. या कारची किंमत तब्बल 7.95 कोटी इतकी आहे. पण विजयने या कार मागचा कर भरलेला नव्हता. या कारवरील कर माफ करण्यात यावा यासाठी त्याने सरकारकडे अर्ज केला होता. या प्रकरणी मद्रास हायकोर्टाने काही महिन्यांपूर्वीच निर्णय दिला होता. खरेदी केलेल्या इंपोर्टेड कारवरील कर न भरल्यामुळे कोर्टाने विजयला जवळपास एक लाखाचा दंड आकारला.
आठ वर्षांपूर्वी इंग्लंडमधून आयात केलेल्या कारवरचा कर वाचवण्यासाठी त्याने भरपूर प्रयत्न केले होते. यासाठी त्याने मद्रास हायकोर्टात कारवरील कर माफ करण्यात यावे यासाठी याचिका सुद्धा दाखल केली होती. तेव्हापासून विजयने या कारवरील कर चुकवला होता. त्यानंतर तब्बल नऊ वर्षानंतर मद्रास हायकोर्टाने विजयने दाखल केलेली याचिका फेटाळली.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.