आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

47 वर्षांचा झाला थलापती विजय:सुपरस्टार रजनीकांतपेक्षाही जास्त मानधन घेतो विजय, बालकलाकार म्हणून केली होती करिअरची सुरुवात

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • विजय हा सर्वाधिक मानधन घेणारा तामिळ अभिनेता आहे.

साऊथचा सुपरस्टार थलापती विजयचा आज वाढदिवस असून त्याने वयाची 47 वर्षे पूर्ण केली आहेत. 22 जून 1976 रोजी चेन्नई येथे जन्मलेल्या विजयला वेगळ्या परिचयाची गरज नाही. गेल्यावर्षी त्याच्या 'मास्टर' या चित्रपटाने कोरोना काळात सर्वाधिक कमाई करुन यशाचे नवीन विक्रम प्रस्थापित केले होते. बॉक्स ऑफिसवर किंग ठरलेल्या विजयच्या 'मास्टर'ने रिलीजच्या काही दिवसांतच 200 कोटींचा गल्ला जमवला होता. व्यापार विश्लेषकांच्या मते, कोरोना काळात 'मास्टर' हा भारतातील पहिला असा चित्रपट आहे, ज्याला बंपर ओपनिंग मिळाली.

सर्वाधिक मानधन घेणारा अभिनेता
विजय हा सर्वाधिक मानधन घेणारा तामिळ अभिनेता आहे. त्याने आपल्या आगामी ‘थलापती 65’ या चित्रपटासाठी तब्बल 100 कोटींचे मानधन घेतले आहे. मानधनात त्याने रजनीकांत यांनाही मागे टाकले आहे. रजनीकांत यांनी ‘दरबार’ साठी 90 कोटी रुपये घेतले होते.

बाल कलाकार म्हणून चित्रपटसृष्टीत प्रवेश

जोसेफ विजय चंद्रशेखर असे विजयचे खरे नाव आहे. तो थलापती म्हणून चाहत्यांमध्ये लोकप्रिय आहे. विजयचे वडील एस.ए. चंद्रशेखर हे कॉलिवूडचे प्रसिद्ध दिग्दर्शक आहेत. विजयने आपल्या वडिलांच्या 15 चित्रपटांमध्ये काम केले आहे, त्यापैकी सहा चित्रपटांमध्ये तो बाल कलाकार म्हणून झळकला.

विजय हा रजनीकांत यांचा मोठा चाहता आहे आणि 1985 साली आलेल्या 'नान सिवापु मनिथन' या चित्रपटात बाल कलाकार म्हणून त्यांच्याबरोबर काम केले होते.

वयाच्या 18 व्या वर्षी विजय 'नालैय्या थीरपू' या चित्रपटात लीड अॅक्टर म्हणून झळकला. या चित्रपटातील त्याचे नाव विजय होते. याच नावाने त्याने 8 चित्रपटांत काम केले आहे. 1992 मध्ये आलेला 'नालैय्या थीरपू' हा चित्रपट जेमतेम ठरला. पण त्यानंतर विजयने एकामागून एक तीन हिट चित्रपट देऊन सर्वांची बोलती बंद केली. विजयने आतापर्यंत आपल्या कारकीर्दीत सुमारे 65 चित्रपटांत काम केले असून त्यापैकी बहुतेक बॉक्स ऑफिसवर ब्लॉकबस्टर ठरले आहेत.

आपली आई शोभा चंद्रशेखर यांच्याप्रमाणेच विजय देखील एक उत्तम गायक आहे. 'थुपक्की' या चित्रपटात त्याने गायलेले 'गूगल गूगल' हे गाणे खूप लोकप्रिय झाले होते. या गाण्यासाठी विजयने सर्वाधिक लोकप्रिय तामिळ गाण्याचा पुरस्कारही आपल्या नावी केला होता.

बातम्या आणखी आहेत...