आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करादाक्षिणात्य सुपरस्टार थलापती विजय सध्या त्याच्या आगामी 'वरिसू' या चित्रपटामुळे चर्चेत आहे. नुकताच त्याच्या चित्रपटाचा ट्रेलरदेखील प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या चित्रपटासोबतच हा अभिनेता आता त्याच्या वैवाहिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. त्याच्या वैवाहिक आयुष्यात सर्वकाही आलबेल नसल्याचे म्हटले जात आहे. तो पत्नीला घटस्फोट देणार असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे.
थलापती विजय आणि संगीता यांच्या लग्नाला 23 वर्षांहून अधिक काळ लोटला आहे. त्यांचे रिलेशनही खूप चांगले आहे. असे असूनही त्यांच्या घटस्फोटाची बातमी येणे चाहत्यांसाठी खूप धक्कादायक होते. खरं तर विजय त्याचे खासगी आयुष्य लाइमलाइटपासून नेहमीच दूर ठेवतो. पण आता लग्नाच्या एवढ्या वर्षांनी त्याच्या घटस्फोटाच्या बातमीने सगळ्यांना धक्का दिला आहे.
सध्या अमेरिकेत आहे विजयची पत्नी
विजयची पत्नी सध्या त्यांच्या मुलांसोबत सुटीचा आनंद घेत असल्याने तिने संगीत सोहळ्याला हजेरी लावली नसल्याचे सांगण्यात येत आहे. विजयचा 'वरिसू' हा चित्रपट येत्या 11 जानेवारी रोजी प्रदर्शित होणार आहे.
1999 मध्ये झाले लग्न
1996 मध्ये एका चित्रपटाच्या सेटवर संगीता आणि विजयची पहिल्यांदा भेट झाली होती. संगीता ही विजयची खूप मोठी चाहती होती. विजयचा प्रत्येक चित्रपट ती आवर्जून पाहायची. त्याला भेटण्यासाठी ती युकेहून चेन्नईला गेली होती. चित्रपटाच्या सेटवर या दोघांनी एकमेकांशी संवाद साधला, तेव्हा संगीताने त्याच्या कामाचे खूप कौतुक केले. यानंतर दोघांमध्ये मैत्री झाली आणि हळूहळू या मैत्रीचे रुपांतर प्रेम झाले. जवळपास तीन वर्षे डेट केल्यानंतर दोघांनी लग्नगाठ बांधली. 25 ऑगस्ट 1999 रोजी विजय-संगीता विवाहबंधनात अडकले. या कपलने हिंदू आणि ख्रिश्चन दोन्ही पद्धतीने लग्न केले होते. त्यांना जेसन संजय हा मुलगा आणि दिव्या साशा ही मुलगी आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.