आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करादाक्षिणात्य अभिनेता थालापती विजयचा आगामी चित्रपटा बीस्टवर कुवैतमध्ये बंदी घालण्यात आली आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, चित्रपटात इस्लामिक दहशतवादाशी संबंधित काही दृश्ये दाखवण्यात आली आहेत. त्यामुळे कुवैतने या चित्रपटाचे प्रदर्शन रोखण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचबरोबर कुवैत सरकारने हा चित्रपट त्यांच्या देशाच्या हिताच्या विरोधात आहे, असे म्हटले आहे.
यापूर्वीही कुवैतमध्ये अनेक चित्रपटांवर घालण्यात आली आहे बंदी
विजयच्या 'होस्टेज थ्रिलर'मध्ये पाकिस्तानी अँगल आणि दहशतवादाशी संबंधित मुद्दे दाखवण्यात आले आहेत. ज्या चित्रपटांमध्ये अरब देशांत दहशतवाद्यांचे अड्डे दाखवले जातात, त्या सर्व चित्रपटांवर तेथे बंदी घालण्यात आली आहे. 'बीस्ट'च्या आधीही कुवैत सरकारने दाक्षिणात्य अभिनेता दुल्कर सलमानच्या 'कुरूप' आणि विष्णू विशालच्या 'एफआयआर' या चित्रपटांवर बंदी घातली होती.
150 कोटींच्या निर्मिती खर्चात तयार झाला चित्रपट
'बीस्ट'चा सामना यशचा कन्नड चित्रपट 'केजीएफ-2'शी होणार आहे. 'बीस्ट'चे दिग्दर्शन नेल्सन दिलीपकुमार यांनी केले आहे. तर संगीत अनिरुद्ध रविचंदर यांचे आहे. या चित्रपटात पूजा हेगडे आणि सेल्वा राघवन यांच्या प्रमुख भूमिका आहेत. बीस्टमध्ये कॉमेडियन योगी बाबूही दिसणार आहे. चित्रपटाचे बजेट 150 कोटी आहे. दिलीप सुपरस्टार रजनीकांत यांच्या आगामी चित्रपटाचेदेखील दिग्दर्शन करत आहेत. रजनीकांत यांच्या कारकिर्दीतील हा 169 वा चित्रपट आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.