आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
पुन्हा राजकारणात प्रवेश करु इच्छित नसून संपूर्ण लक्ष अभिनयावर केंद्रित करणार असल्याचे तेलुगु चित्रपटसृष्टीतील मेगास्टार चिरंजीवी यांनी म्हटले आहे. चिरंजीवी यांनी अलीकडेच अभिनेत्री समांथा अक्किनेनीच्या सॅम जॅम या चॅट शोमध्ये हजेरी लावली होती. यावेळी राजकारणाविषयी बोलताना ते म्हणाले की, "राजकारणात प्रवेश केल्यानंतर मला जाणवले की मी कॅमे-याला मिस करतोय. पण राजकारणातून बरेच काही शिकलो देखील आहे.'
लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी पक्ष स्थापन केला होता
चिरंजीवी यांनी लोकांना सामाजिक न्याय मिळवून देण्यासाठी 2008 मध्ये प्रजा राज्यम पार्टी (पीआरपी) ची स्थापना केली होती. 2009 च्या निवडणुकीत ते तिरुपती येथून विधानसभेचे सदस्य म्हणून निवडून गेले होते. 2011 मध्ये त्यांनी आपला पक्ष कॉंग्रेसमध्ये (आयएनसी) विलीन केला. त्याच वेळी, 27 ऑक्टोबर 2012 ते 15 मे 2014 पर्यंत त्यांनी स्वतंत्र प्रभारी राज्यमंत्री म्हणून कार्यभार स्वीकारला. 2014 मधील सार्वत्रिक निवडणुकांनंतर चिरंजीवी यांनी राजकारणातून निवृत्ती घेतली.
2017 मध्ये ब्लॉकबस्टर चित्रपटातून केले होते कमबॅक
राजकारणामध्ये बराच काळ घालवल्यानंतर चिरंजीवींनी 2017 मध्ये चित्रपटात पुनरागमन केले. चिरंजीवीचा कमबॅक चित्रपट 'खिलाडी नं. 150' हा चित्रपट हिट ठरला होता. या चित्रपटाने 100 कोटींचा व्यवसाय केला होता.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.