आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Entertainment
  • Bollywood
  • The Bail Application Of Sushant's Friend Siddharth Pithani Was Rejected For The Second Time, The Court Did Not See Any Merit In The Application

सुशांत सिंह राजपूत ड्रग्ज प्रकरण:सुशांतचा मित्र सिद्धार्थ पिठानीचा जामीन अर्ज दुसऱ्यांदा फेटाळला, कोर्टाला अर्जात जामीन देण्याचे कोणतेही ठोस दिसले नाही

4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • सिद्धार्थचा जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळण्याची ही दुसरी वेळ आहे.

बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूनंतर नार्कोटिक कंट्रोल ब्यूरो या प्रकरणातील ड्रग अँगलची तपासणी करत आहे. चौकशीत आतापर्यंत अनेक लोकांची नावे समोर आली आहेत. या प्रकरणात, सुशांतचा मित्र आणि रुममेट सिद्धार्थ पिठानीला 29 मे रोजी हैदराबाद येथून अटक करण्यात आली होती. आता सिद्धार्थचा जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला आहे. सिद्धार्थचा जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळण्याची ही दुसरी वेळ आहे. न्यायालयाला सिद्धार्थचा जामीन अर्ज मान्य करण्याचे कोणतेही योग्य कारण न मिळाल्याने हा अर्ज फेटाळण्यात आला आहे.

सिद्धार्थ पिठानीचे वकील तारक सय्यद यांनी ईटाइम्सला सांगितल्यानुसार, त्याचा जामीन अर्ज NDPC न्यायालयाने फेटाळला आहे. एनसीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांच्या म्हणण्यानुसार, कोर्टाने त्याचा जामीन फेटाळला आहे, कारण त्यांना या अर्जात जामीसाठीचे कोणतेही ठोस कारण दिसले नाही.

दुसऱ्यांदा जामीन अर्ज फेटाळला

मे महिन्यात अटक करण्यात आलेल्या सिद्धार्थ पिठानीला 25 जून रोजी लग्नासाठी तुरुंगाबाहेर येण्याची परवानगी देण्यात आली होती, त्यानंतर त्याने स्वतः 2 जुलै रोजी न्यायालयासमोर आत्मसमर्पण केले होते. त्यानंतर त्याने दाखल केलेले दोन जामीन अर्ज फेटाळण्यात आले आहेत.

14 जून रोजी सुशांतच्या मृत्यूच्या वेळी सिद्धार्थ पिठानी त्याच्या घरी उपस्थित होता. सिद्धार्थनेच सुशांतचा मृतदेह फासावरुन खाली उतरवला होता. सुशांतसोबत राहणाऱ्या केशव आणि नीरज यांनी अंमली पदार्थांच्या प्रकरणात सिद्धार्थचा सहभाग असल्याचे संकेत पोलिसांना दिले होते.

सिद्धार्थवर सुशांतला ड्रग्ज खरेदी करण्यात मदत केल्याचा आरोप आहे, त्यानंतर त्याला एनडीपीसी कायद्याच्या कलम 27-ए अंतर्गत अटक करण्यात आली होती.

बातम्या आणखी आहेत...