आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
दिग्दर्शक रोहित शेट्टीच्या पोलिसांवर आधारित चित्रपटाची सुरुवात अजय देवगणच्या ‘सिंघम’ चित्रपटाने झाली होती. त्यानंतर रणवीर सिंहचा ‘सिम्बा’ आला आणि आता सर्वांनाच अक्षय कुमारच्या ‘सूर्यवंशी’ प्रतीक्षा आहे. ‘सूर्यवंशी’ यावर्षी थिएटरमध्ये रिलीज होणार आहे. दुसरीकडे आता एक एक्सक्लुझिव्ह बातमी आहे की, राेहितने ‘सिंघम ३’ची तयारी सुरू केली आहे. यात अजयची टक्कर ‘सूर्यवंशी’मध्ये दहशतवादी बनलेल्या जॅकी श्रॉफशी होणार आहे.
जॅकी श्रॉफची एंट्री ‘सिंघम 3’ मध्ये झाली आहे. या चित्रपटात राेहित पोलिस आणि खलनायक दोघांना दमदार दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे. आतापर्यंत त्याने ‘सिम्बा’मध्ये अजय आणि अक्षयची एंट्री दाखवली, ‘सूर्यवंशी’मध्ये रणवीर आणि अजयची एंट्री होणार आहे. याबरोबरच रोहितने ‘सिंघम 3’च्या कथेशी ‘सूर्यवंशी’शी कथा जोडली आहे. ‘सूर्यवंशी’मध्ये जॅकी श्रॉफ एका अतिरेक्याच्या भूमिकेत आहेत. चित्रपटात दाखवण्यात येणाऱ्या सर्व दहशतवादी कुरापती तोच रचताना दाखवण्यात येणार आहे. तरीदेखील अक्षय, अजय आणि रणवीर मिळून जॅकीला मारू शकणार नाहीत.
‘सूर्यवंशी’च्या शेवटी अक्षय या केसची फाइल अजय (सिंघम)च्या हवाली करताे. येथूनच ‘सिंघम 3’ची कथा सुरू होते. याचा बेसिक ड्राफ्ट बनून तयार आहे. रोहित आणि अजय किती दिवस ‘सिंघम 3’चे शूटिंग करतील अजून हे स्पष्ट झाले नाही. कारण, सध्या रणवीर सिंहसोबत ‘सर्कस’च्या शूटिंगमध्ये व्यग्र आहे. यानंतर तो अजयसोबत ‘गोलमाल 5’ सुरू करणार आहे. याची स्क्रिप्टदेखील जवळजवळ तयार आहे. मात्र तो 2022 पर्यंत टाळू शकतो. रोहित ‘सूर्यवंशी’ आणि ‘सिंघम 3’ मध्ये जास्त अंतर ठेवू इच्छित नाही.
याबरोबरच गुरुवारी अजयचा आणखी एक चित्रपट ‘थँक गॉड’ची घोषणाही झाली. या चित्रपटात त्याच्यासोबत सिद्धार्थ मल्होत्रा आणि रकुलप्रीत सिंह मुख्य भूमिकेत आहेत.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.