आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ब्रह्मास्त्र:लॉकडाऊनमुळे वाढले चित्रपटाचे बजेट, रणबीर-आलिया-अयानने घेतला हा मोठा निर्णय 

मुंबई2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • आता कोरोनामुळे सुरु असलेल्या लॉकडाऊनमुळे रिलीड डेट लांबणीवर पडण्याची शक्यता आहे.

बऱ्याच दिवसांपासून निर्माण होत असलेला रणबीर कपूर आणि आलिया भट अभिनित ‘ब्रह्मास्त्र’ चित्रपट पुन्हा एकदा संकटात आहे.  हा चित्रपट ब-याच दिवसांपासून रखडला आहे. अयान मुखर्जी दिग्दर्शित हा चित्रपट यावर्षी 4 डिसेंबर रोजी रिलीज होणार होता. दोन वर्षांपूर्वी चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात झाली होती. पण आता कोरोनामुळे सुरु असलेल्या लॉकडाऊनमुळे रिलीड डेट लांबणीवर पडण्याची शक्यता आहे. 

रणबीर-आलिया आणि अयानने केली मानधनात कपात  

चित्रपटाचे 40 दिवसांचे चित्रीकरण अजूनही बाकी आहे. ते पुढे सुरू होईल असे चिन्हही दिसत नाही. मुंबईतील एका स्टुडिओत हेवी व्हीएफएक्सचे काम आणि शाहरुख खान सोबतचे एक दृश्य चित्रीत करायचे बाकी आहे. या होत असलेल्या उशिरामुळे चित्रपटाचे बजेट पुन्हा एकदा बिघडले आहे. यावर पुन्हा निर्माता करण जोहर काम करत आहे. 

चित्रपटावर आलेल्या या संकटामुळे चित्रपटातील मुख्य कलाकार आणि दिग्दर्शक अयान मुखर्जी याने स्वत:च आपले मानधन कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, धर्मा प्रॉडक्शन्स मानधनाच्या बदल्यात चित्रपटाच्या यशातील प्रॉफिट शेअर त्यांना देण्याच्या विचारात आहे.  या चित्रपटाची प्रदर्शनाची तारीख अनेकदा लांबणीवर पडली आहे. चित्रपटात आलिया आणि रणबीर यांच्यासह अमिताभ बच्चन, नागार्जुन, मौनी रॉय यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत. चित्रपट अनेक भाषांमध्ये डब केला जाणार आहे. ही एक ट्रायलॉजी सीरिज असेल.   

बातम्या आणखी आहेत...