आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राज कुंद्राच्या अडचणीत वाढ:पोर्नोग्राफी प्रकरणाच्या तपासासाठी गुन्हे शाखेने केली एसआयटीची स्थापना, करणार अधिक सखोल तपास

4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • राज कुंद्राच्या जामिन याचिकेवर 20 ऑगस्टला सुनावणी

पॉर्नोग्राफी प्रकरणात बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती आणि उद्योजक राज कुंद्राच्या अडचणी वाढताना दिसत आहेत. मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने आता या प्रकरणाचा अधिक सखोल तपास करण्यासाठी एका विशेष तपास पथकाची अर्थात एसआयटीची स्थापना केली आहे. ही टीम फक्त पोर्नोग्राफी रॅकेटशी संबंधितच तपास करणार आहे.

सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या एसआयटीची स्थापना केली आहे. या एसआयटीचे नेतृत्व एसीपी दर्जाचा अधिकारी करणार आहे. ही टीम गुन्हे अन्वेषण विभागाच्या वरिष्ठ अधिका-यांना अहवाल सादर करणार आहेत. याप्रकरणाचा तपास आता मुंबई पोलिसांच्या गुन्हे विभागाच्या प्रॉपर्टी विभागाकडे आहे. याप्रकरणामध्ये राज कुंद्रा हा मुख्य आरोपी असल्याचे मानले जात आहे. सध्या त्याला ऑर्थर रोज कारागृहात ठेवण्यात आले आहे.

राज कुंद्राच्या जामिन याचिकेवर 20 ऑगस्टला सुनावणी
दरम्यान राज कुंद्राच्या जामीन अर्जावर मुंबईचे सत्र न्यायालय आता 20 ऑगस्ट रोजी निर्णय देणार आहे. तोपर्यंत त्याला तुरुंगात राहावे लागेल. राज कुंद्राच्या जामीन अर्जावर 10 ऑगस्ट रोजी सुनावणी झाली, जी पुढे ढकलण्यात आली आहे. या सुनावणीदरम्यान पोलिसांनी राज कुंद्राच्या जामीन अर्जाला विरोध दर्शवला आणि न्यायालयाला सांगितले की, त्याला जामीन दिल्यास समाजाला चुकीचा संदेश जाईल. राज कुंद्राची जामिनावर सुटका झाल्यास तो पुन्हा तोच गुन्हा करू शकतो आणि देश सोडून पळून जाऊ शकतो असेही पोलिसांनी म्हटले आहे. राज कुंद्राकडे युकेचे नागरिकत्व असल्यामुळे पोलिसांनी हे सांगितले आहे.

याआधीही जामिन अर्ज फेटाळला होता
राज कुंद्राने जामिन मिळावा यासाठी 28 जुलै रोजी अर्ज केला होता. परंतु त्याचा जामिन अर्ज न्यायालयाने फेटाळून लावला. पोलिसांनी न्यायालयात सांगितले की, राज कुंद्राच्या विरोधात केवळ साक्षीदार नाही तर सबळ पुरावे देखील आहेत. राज कुंद्राच्या कार्यालयात घातलेल्या छाप्या दरम्यान 68 अॅडल्ट व्हिडिओ पोलिसांनी जप्त केले आहेत. राजला जर जामिन दिला तर तो साक्षीदार आणि पुरावे नष्ट करू शकतो, त्यामुळे त्याला जामिन दिला जाऊ नये, अशी मागणी पोलिसांनी केली. पोलिसांनी केलेल्या या युक्तीवादामुळे न्यायालयाने राज कुंद्राचा जामिन अर्ज फेटाळून लावला होता.

शार्लिन चोप्राचा जबाब महत्त्वाचा
राज कुंद्रा प्रकरणामध्ये शर्लिन चोप्राने नोंदवलेला जबाब महत्त्वाचा मानला जात आहे. तिने दिलेल्या साक्षीमुळे या प्रकरणाला वेगळे वळण लागू शकते. शर्लिनने राजला अटक होण्याआधी एप्रिल महिन्यात त्याच्याविरोधात लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी तक्रार दाखल केली होती. मुंबई पोलिसांनी राज कुंद्राप्रकरणी शर्लिनची सलग आठ तास चौकशी केली. त्यावेळी शर्लिनने राज आणि त्याच्या कंपनीसोबत असलेल्या संबंधांची माहिती दिली. राज कुंद्रासोबत व्हॉटसअॅप चॅटवर झालेले संभाषण आणि कराराची कॉपीही तिने पोलिसांना दिली.

या कलमांखाली राजला झाली अटक
राज कुंद्राला 19 जुलै रोजी अटक करण्यात आली. त्याला प्रथम 27 जुलैपर्यंत पोलिस कोठडी देण्यात आली, तर फोर्ट कोर्टाने (एस्प्लेनेड कोर्ट) नंतर त्याला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. राज कुंद्रासह त्याचा आयटी प्रमुख रायन थोरपे याच्या जामीन अर्जावरही सुनावणी होणार होती. रायनच्या जामीन अर्जावरही निर्णय आता 20 ऑगस्टलाच येईल. राज कुंद्राच्या विरोधात आयपीसी कलम 292, 296 अश्लिल व्हिडिओ बनवणे, विकणे, कलम 420 लोकांचा विश्वासघात करणे,सूचना प्रौद्योगिकी अधिनियम अंतर्गंत कलम 67, 67अ, अश्लिल व्हिडिओ चित्रीत करणे आणि ते ऑनलाइन शेअर करणे, सामग्री करणे आणि प्रसारित करणे, कलम 2 जी, 3, 4, 6, 7 महिलांवर अश्लिल फिल्म बनवणे, ते विकणे आणि प्रसारित करणे या कलमांतर्गंत अटक झाली आहे.

बातम्या आणखी आहेत...