आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Entertainment
  • Bollywood
  • The Deal For The Digital Premiere Of 'Sooryavanshi' Was Finalized For 100 Crores, The Digital Rights Of 'Thalaivi' Were Sold For 55 Crores

ओटीटी रिलीज:नेटफ्लिक्सने 100 कोटींना विकत घेतले 'सूर्यवंशी'चे डिजिटल हक्क, 55 कोटींमध्ये झाली होती कंगनाच्या 'थलायवी'ची डील

16 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • येत्या 5 डिसेंबरला हा चित्रपट नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होण्याची शक्यता आहे.

नेटफ्लिक्सने अक्षय कुमार आणि कतरिना कैफ स्टारर 'सूर्यवंशी' चित्रपटाचे डिजिटल हक्क 100 कोटी रुपयांना विकत घेतले आहेत. डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात हा चित्रपट OTT प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे. येत्या 5 डिसेंबरला हा चित्रपट नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होण्याची शक्यता आहे.

नुकत्याच आलेल्या इंडिया टुडेच्या रिपोर्टनुसार, 5 नोव्हेंबरला चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झालेल्या सूर्यवंशी चित्रपटाला खूप चांगला प्रतिसाद मिळाला आहे. या चित्रपटाने भारतीय बाजारात 100 कोटींहून अधिकचा व्यवसाय केला आहे. अद्याप या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.

'सूर्यवंशी'चा कमाईचा आकडा 100 कोटींच्या पलीकडे
चित्रपटाने रिलीजपासून 7 दिवसांत भारतीय बॉक्स ऑफिसवर 120 कोटींचा गल्ला जमवला आहे, तर ओव्हरसीजमध्ये चित्रपटाने 5 मिलियन डॉलर म्हणजेच 37.22 कोटींचा व्यवसाय केला आहे. 100 कोटींना डिजिटल अधिकार विकल्यानंतर सूर्यवंशीने 250 कोटी रुपये कमावले आहेत.

55 कोटींना विकले गेले होते 'थलायवी'चे डिजिटल हक्क

या वर्षी प्रदर्शित झालेला कंगना रनोटचा थलायवी चित्रपट चित्रपटगृहांनंतर ओटीटी प्लॅटफॉर्मवरही प्रदर्शित झाला. या चित्रपटाची डील सुमारे 55 कोटींमध्ये निश्चित झाली होती, जी सूर्यवंशीच्या निम्मी आहे. हा चित्रपट Netflix आणि Amazon Prime वर वेगवेगळ्या भाषांमध्ये स्ट्रीम करण्यात आला होता.

अक्षय कुमार आणि कतरिना कैफ स्टारर चित्रपट देशभरात 3500 स्क्रीन्सवर आणि इतर 66 देशांमध्ये 1300 स्क्रीन्सवर रिलीज झाला आहे. रिलीजच्या दुसऱ्याच दिवशी पंजाबमधील अनेक चित्रपटगृहांतून हा चित्रपट वगळण्यात आला. पंजाबमधील शेतकरी आंदोलनातील अनेक शेतकऱ्यांनी अक्षय कुमारला भाजपचा समर्थक म्हणत त्याचा पुतळाही जाळला. पहिल्या दिवसानंतर पंजाबच्या कलेक्शनमध्ये घट झाली असली तरी गुजरात आणि मुंबईत या चित्रपटाची क्रेझ पाहायला मिळत आहे.

बातम्या आणखी आहेत...