आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Entertainment
  • Bollywood
  • The Debate On Nepotism Erupted After The Suicide Of Sushant Singh Rajput, Abhay Deol Said I’m Sorry It Took Someone’s Death To Wake Everybody Up

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

घराणेशाहीवरुन वाद:अभय देओलचा खुलासा,  म्हणाला - 'एखाद्या मृत्यूनंतर लोक जागे होतात, इंडस्ट्रीत लॉबी कल्चर अनेक दशकांपासून आहे'

मुंबईएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • मला वाईट वाटते की एखाद्याच्या मृत्यूनंतर सर्व लोक जागे होतात, अशी खंत त्याने बोलून दाखवली.

सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येनंतर चित्रपटसृष्टीवर घराणेशाही आणि गटबाजीचे सतत आरोप होत आहेत. इंडस्ट्रीती होत असलेल्या भेदभावामुळे सुशांतला आत्महत्या करण्यास भाग पाडले हे सोशल मीडिया यूजर्ससह बॉलिवूडमधील अनेक सेलेब्स उघडपणे मान्य करत आहेत.   जागे होण्यासाठी लोक एखाद्याच्या मृत्यूची वाट बघतात, अशी खंत सुरुवातीपासूनच घराणेशाहीविरूद्ध तीव्र प्रतिक्रिया देणा-या अभय देओलने व्यक्त केली आहे.

  • सुशांतच्या मृत्यूने त्याला बोलण्यास उद्युक्त केले: अभय

हिंदुस्तान टाईम्सशी बोलताना ते म्हणाले- सुशांतचा मृत्यूने मला नक्कीच बोलण्यासाठी प्रेरणा देतो. पण, मी प्रथमच आवाज उठवत नाहीये. यापूर्वीही  मी अनेक मोठे मुद्दे उपस्थित केले. मला वाईट वाटते की एखाद्याच्या मृत्यूनंतर सर्व लोक जागे होतात, अशी खंत त्याने बोलून दाखवली.  

लोक आता या विषयाकडे गांभीर्याने लक्ष देत आहेत, याबद्दल अभयने आनंदही व्यक्त केला. तो म्हणतो की लोक बदलांविषयी बोलत आहेत. केवळ इंडस्ट्रीच्या बाहेरच नाही तर आतमध्ये देखील. कलाकार आज खुलेपणाने बोलत आहेत ही नक्कीच चांगली गोष्ट आहे.

  • 'लॉबी संस्कृती अनेक दशकांपासून इंडस्ट्रीत आहे'

अभय देओलने अलीकडेच 'जिंदगी ना मिलेगी दोबारा' चित्रपटाविषयीची पोस्ट टाकली होती. त्यात त्याने लिहिले होते की, इंडस्ट्रीमध्ये असे बरेच प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष मार्ग आहेत ज्याद्वारे लोक तुमच्याविरूद्ध लॉबी करतात. त्याच्या पोस्टने लक्ष वेधून घेतले होते.  

आमच्या इंडस्ट्रीत लॉबी संस्कृती काही वर्षांपासून नसून अनेक दशकांपासून आहे.  मी हे सर्व सांगू शकतो, कारण मी फिल्म फॅमिलीत मोठा झालो आहे आणि लहानपणापासूनच या गेमविषयी ऐकत आहे. लहान असताना मी इतरांच्या अनुभवावरून ऐकले होते आणि आता मी स्वतः एक प्रोफेशनलच्या रुपात पाहतोय, असे अभय म्हणाला. 

अभय पुढे म्हणाला, मी विशेषाधिकारांवर लक्ष केंद्रित करतो. माझे एक कुटुंब आहे, मित्रांचा एक मोठा ग्रुप आहे. माझ्याकडे काम आहे, अभिनय करतोय, प्रॉडक्शन करतोय आणि सध्यो दोन देशांमध्ये (भारत आणि अमेरिका) कार्यरत आहे. मी माझा स्वतःचा मार्ग बनवला. कधी गेम खेळला नाही. त्यामुळे आता मी स्वत:ला यातून बाहेर बघतोय.  

बातम्या आणखी आहेत...