आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुन्हा एकदा मदतीसाठी पुढे आला सोनू सूद:मर्सिडीजने धडक दिल्याने डिलिव्हरी बॉयचा मृत्यू, सोनू सूदने घटनास्थळी पोहोचून कुटुंबीयांना दिले मदतीचे आश्वासन

7 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • घटनेची माहिती मिळताच सोनू सूद घटनास्थळी पोहोचला आणि पीडित कुटुंबाशी बोलला.

मुंबईच्या अंधेरी भागात हिट अँड रन प्रकरणात मृत पावलेल्या झोमॅटोचा डिलिव्हरी बॉय सतीश पारसनाथ गुप्ता (19) याच्या कुटुंबाच्या मदतीसाठी अभिनेता सोनू सूद पुढे आला आहे. शुक्रवारी घटनास्थळी पोहचलेल्या सोनूने मृतकच्या कुटुंबाला सर्वतोपरी आर्थिक मदत करण्याचे आश्वासन दिले. मर्सिडिज कारने धडक दिल्याने सतीशचा घटनास्थळीच मृत्यू झाला होता. याप्रकरणी ओशिवरा पोलिसांनी एका 20 वर्षीय तरुणाला अटक केली आहे.

ही धडक इतकी जोरदार होती की स्कूटीची अशी अवस्था झाली. सतीश गुप्ता (उजवीकडे) घटनास्थळीच मृत पावला.
ही धडक इतकी जोरदार होती की स्कूटीची अशी अवस्था झाली. सतीश गुप्ता (उजवीकडे) घटनास्थळीच मृत पावला.

सोनूने सतीशच्या कुटूंबाशी आणि या प्रकरणाचा तपास करणार्‍या अधिका-यांशी बातचीत केली. तसेच दोषींना कडक शिक्षा करण्याचे आश्वासन त्याने कुटुंबीयांना दिले आहे. ही घटना गुरुवारी मध्यरात्री अडीच ते तीनच्या दरम्यान घडली होती. या प्रकरणात पोलिसांनी कार चालवत असलेल्या तफूर तनवीर शेख याला अटक केली आहे. शेख हा मुंबईतील एका उच्चभ्रू कुटुंबाशी संबंधित असल्याचे सांगितले जाते. त्याच्याबरोबर गाडीत बसलेल्या अन्य तीन तरुणांनाही पोलिसांनी अटक केली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सर्व जण मद्यधुंद अवस्थेत होते. सध्या त्यांच्या वैद्यकीय अहवालाची प्रतीक्षा आहे.

आरोपीच्या वडिलांचा ड्रायफ्रूटचा मोठा व्यवसाय
पोलिस निरीक्षक दयानंद बांगर यांनी सांगितले की, शेखविरोधात भादंवि कलम 279, 304 (A) आणि मोटार वाहन कायद्याच्या कलम 196 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सूत्रांच्या माहितीनुसार शेखचे वडील व्यापारी असून ड्राय फ्रूट्सची निर्यात करतात. प्रत्यक्षदर्शींच्या म्हणण्यानुसार, मर्सिडीज कार 100 पेक्षा जास्त वेगाने चुकीच्या दिशेने येत होती. या अपघातात कारचा पुढील भाग व स्कूटी चक्काचूर झाली आहे. अपघातानंतर आरोपी कार सोडून पळून जाण्याच्या प्रयत्नात होते, परंतु स्थानिकांनी त्यांना पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले.

प्रत्यक्षदर्शींच्या म्हणण्यानुसार, अपघाताच्या वेळी कारचा ताशी वेग 100 पेक्षा जास्त होता.
प्रत्यक्षदर्शींच्या म्हणण्यानुसार, अपघाताच्या वेळी कारचा ताशी वेग 100 पेक्षा जास्त होता.

कुटुंबाने केली न्यायाची मागणी
मृतकचे मामा सतीश गुप्ता म्हणाले, 'सतीश एक वर्षापासून झोमॅटो येथे डिलिव्हरी बॉय म्हणून काम करायचा. तो डिलिव्हरी घेऊन जात असताना समोरून येणार्‍या मर्सिडीजने त्याला धडक दिली. अपघाता वेळी कारमध्ये 3-4 लोक उपस्थित होते. त्याला स्थानिक लोकांनी जखमी अवस्थेत कोकिलाबेन रुग्णालयात नेले, परंतु त्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता. हे हाय प्रोफाइल प्रकरण आहे. आरोपीला कठोर शिक्षा मिळावी आणि सतीशच्या कुटूंबाला न्याय मिळावा, अशी आमची मागणी आहे.'

बातम्या आणखी आहेत...