आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

माहीत आहे का?:राजकुमार रावला स्वत:बरोबर इतरांचेही संवाद असतात पाठ, 2014 मध्ये 'यादव' आडनाव बदलून केले 'राव'

शब्दांकन - अंकिता तिवारी3 महिन्यांपूर्वी
 • कॉपी लिंक
 • राजकुमार रावने आपल्या नावाच्या स्पेलिंगमध्ये एक जादा एम हे अक्षर जोडले.

राजकुमार राव यांचा जन्म 31 ऑगस्ट 1985 मध्ये हरियाणाच्या गुडगावात झाला आहे. शालेय जीवनापासून त्यांना अभिनय आणि नृत्याची आवड आहे. दिल्लीत शिक्षण घेतल्यानंतर त्यांनी पुणे येथील फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडियामधून अभिनयाचे प्रशिक्षण घेतले. त्यानंतर चित्रपटात नशीब आजमावण्यासाठी मुंबईला आले. येथे त्यांनी सामान्य लोकांप्रमाणे संघर्ष केला. अनेक ऑडिशन दिले आणि सुरू झाला सिनेप्रवास...

 • ‘काय पो छे’मधून मिळाला ब्रेक

दिबाकर बॅनर्जी यांच्या ‘लव्ह सेक्स और धोका’ (2010)मधून आपल्या कारकीर्दीची सुरुवात केल्यानंतर राजकुमार राव यांनी अनेक चित्रपटांत सहायक भूमिका केल्या. रागिनी एम एम एस 2, गँग्स ऑफ वासेपुर पार्ट 2, आमिर खानच्या तलाशमध्येही काम केले. मात्र, काय पो छे चित्रपटातून त्यांना मोठा ब्रेक मिळाला. हंसल मेहताच्या शाहिद चित्रपटासाठी त्यांना उत्कृष्ट अभिनेत्याचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. याबरोबरच त्यांना या चित्रपटासाठी समीक्षकांची पसंत श्रेणीत उत्कृष्ट अभिनेत्याचा फिल्मफेअर मिळाला. यानंतर क्वीन (2014), अलीगढ (2016), ट्रॅप्ड (2016) मध्ये कामाचे कौतुक झाले. 2017 मध्ये आलेल्या बरेली की बर्फीसाठी त्यांना सहायक अभिनेत्याचा फिल्मफेअर पुरस्कार मिळाला. यात आयुष्मान खुराणादेखील होते.

 • 'राब्ता'मध्ये साकारली 324 वर्षांच्या ज्येष्ठाची भूमिका

दिनेश व्हिजन यांच्या राब्तामध्ये 324 वर्षाच्या ज्येष्ठाची भूमिका साकारली होती. यात त्यांच्यासोबत कृती सेनन आणि सुशांत सिंह राजपूतने काम केले होते. राजकुमार राव यात एका खलनायकाच्या भूमिकेत दिसला होता. यासाठी राजकुमारला प्रोस्थेटिक मेकअप करावा लागला होता. यासाठी त्याला रोज 5 ते 6 तास लागायचे. मात्र हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर जास्त कमाल करू शकला ना

 • ऑस्करसाठी झाली होती ‘न्यूटन’ची निवड

न्यूटन सारख्या चित्रपटातून राजकुमारने आपले स्थान पक्के केले. या चित्रपटाने त्यांना व्यावसायिक यश आणि पुरस्कारही मिळवुन दिले. त्यांना बेस्ट अॅक्टर एशिया पॅसिफिक स्क्रीन अवॉर्ड मिळाला. या चित्रपटाचा वर्ल्ड प्रीमियर 67 व्या बर्लिन आंतरराष्ट्रीय सिने .

 • पात्राचा अभ्यास करून काम करतो - - मिखिल मुसाले, दिग्दर्शक, मेड इन चायना

मेड इन चायना माझा पहिला हिंदी चित्रपट होता, पण राजकुमार रावने मला खूप साथ दिली. त्याच्यात भूमिकेसाठी अभ्यास, तयारी आणि कठोर परिश्रम करण्याची गुणवत्ता खूप प्रभावी आहे. ही गुणवत्ता मला आवडते.

 • क्रिकेटसाठी वेडा आहे राजकुमार - अमित मसूरकर, दिग्दर्शक (न्यूटन)

आम्ही छत्तीसगडमधील एका हॉटेलमध्ये ‘लव्ह सेक्स और धोका’ चित्रपटाचे शूटिंग करत होतो. त्या वेळी आमच्या खोलीत टीव्ही नव्हता आणि राजकुमाराला क्रिकेट इतके आवडते की त्याने हॉटेलच्या खाली असलेले इलेक्ट्रॉनिक दुकान उघडायला लावले आणि रात्री तेथे क्रिकेटचा सामना पाहत बसला. अमित म्हणतात, न्यूटन चित्रपटात कुरळ्या केसाची कल्पना त्याची होती. त्याला विखुरलेले आणि कुरळे केस असलेले शास्त्रज्ञ न्यूटनसारखे दिसायचे होते. मला त्याचे बोलणे आणि कामनिष्ठा आवडते. राजकुमारकडे मार्शल आर्टमधील ब्लॅक बेल्ट आहे. राजकुमारला बऱ्याचदा अ‍ॅक्शन सीन्स करण्याची इच्छा असते, परंतु त्याची ही इच्छा क्वचितच पूर्ण होते. शूटसाठी तो 3 वाजता उठतो, व्यायाम करतो आणि शूटसाठी शार्प 6 वाजता सेटवर येतो. आपल्या कामाबद्दल इतकी निष्ठा खरच एक मोठी गोष्ट आहे. तो नेहमी आपल्या आरोग्याची काळजी घेतो.

 • स्वत:बरोबर इतरांचेही संवाद त्याला माहीत असतात, - अमर कौशिक, दिग्दर्शक

राजकुमार पूर्ण शाकाहारी आहे. तो सेटवर सर्वात जास्त खोड्या काढतो. सर्वांशी चांगलो वागतो, बोलतो, मस्ती करतो. त्याचा सर्वात वेगळा गुण म्हणजे त्याला स्वतःच्या संवादाबरोरबच समोरच्या अभिनेत्याचे संवादही त्याला पाठ असतात.

विशेष बाबी

 • 10 वर्षात 33 सिनेमे
 • 03 फिल्मफेअर पुरस्कार आणि 01 राष्ट्रीय पुरस्कार
 • राजकुमार कारकीर्दीच्या सुरुवातीपासूनच अभिनेत्री पत्रलेखा पॉलसोबत रिलेशनशिपमध्ये आहेत.
 • मनोज वाजपेयी यांच्या अभिनयाने प्रभावित होऊन राजकुमार चित्रसृष्टीत आले.
 • 2014 मध्ये राजकुमार यांनी आपले यादव आडनाव बदलून राव केले. तसेच आपल्या नावाच्या स्पेलिंगमध्ये एक जादा एम हे अक्षर जोडले.