आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

घरात आढळला अभिनेत्रीचा मृतदेह:‘द डर्टी पिक्चर’मध्ये झळकलेली आर्या बॅनर्जीचा संशयास्पद मृत्यू, कोलकातामध्ये एकटी राहात होती

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • दार तोडून मृतदेह बाहेर काढला

विद्या बालन स्टारर ‘द डर्टी पिक्चर’ या चित्रपटात झळकलेली अभिनेत्री देवदत्त बॅनर्जी ऊर्फ आर्या हिचा संशयास्पद मृत्यू झाला. कोलकातामधील जोधपूर पार्क येथील राहत्या घरी आर्या मृतावस्थेत आढळली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तिच्या नाकावर रक्ताचे काही डाग होते. तर घरात उलटीदेखील होती. पण त्याव्यतिरिक्त शरीरावर कुठलीही दुखापत झाली नव्हती. आर्याला एसएसकेएम रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. ही घटना शुक्रवारी घडली.

दार तोडून मृतदेह बाहेर काढला
अनेकदा दार ठोठावूनही आर्याने काही उत्तर न दिल्याने घरकाम करणाऱ्या व्यक्तीने शेजाऱ्यांना बोलावले. बऱ्याच वेळापासून घरात बंद असल्याने शेजाऱ्यांनी पोलिसांना याबद्दलची माहिती दिली. पोलिसांनी दार तोडून आत प्रवेश केला असता आर्या तिच्या बेडरुममध्ये जमिनीवर मृतावस्थेत आढळली.

आपल्या पाळीव श्वानासोबत एकटी राहायची आर्या
पोलिसांनी सांगितल्यानुसार, 33 वर्षीय आर्या कोलकाता येथे आपल्या पाळीव श्वानासोबत एकती राहात होती. तिची बहीण सिंगापूरला वास्तव्याला असते. आर्याच्या बेडरुममध्ये पोलिसांना दारुच्या रिकाम्या बाटल्या आढळल्या आहेत.

आर्याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्याता आला आहे. शवविच्छेदनाचे अहवाल आल्यानंतरच मृत्यूचे कारण स्पष्ट होईल, अशी माहिती पोलिसांनी दिली. पोलिसांनी आर्याचे दोन मोबाइल फोनसुद्धा तपासासाठी जप्त केले आहेत.

'एलएसडी'मध्ये केले होते काम
आर्या ही प्रसिद्ध सितारवादक दिवंगत पंडित निखिल बॅनर्जी यांची कन्या होती. कोलकातामध्ये जन्मलेल्या आर्याने मॉडेलिंगपासून करिअरची सुरुवात केली. शास्त्रीय संगीतामध्ये तिने पदव्युत्तर पदवी घेतली होती. 2010 मध्ये प्रदर्शित झालेल्या दिबाकर बॅनर्जी यांच्या ‘एलएसडी : लव्ह सेक्स और धोखा’ या चित्रपटातून तिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. त्यानंतर 2011 मध्ये तिने ‘द डर्टी पिक्चर’मध्येही काम केले होते. मुंबईत काही मॉडेलिंग प्रोजेक्ट्सही तिने केले होते.

Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser