आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खुलासा:'द फॅमिली मॅन 2' फेम अभिनेता शरद केळकरने सांगितले - बालपणी अडखळत बोलत असल्याने मला डिवचले जायचे, यावर मात करण्यासाठी मला दोन वर्षे लागली

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • डिसऑर्डरमुळे कधी अभिनयाचा विचार केला नव्हता

'द फॅमिली मॅन 2' या लोकप्रिय वेब सीरिजमध्ये झळकलेला अभिनेता शरद केळकरने अलीकडेच एका मुलाखतीत खुलासा केला की, बालपणी तो अडखळत बोलत असे. यामुळे त्याला डिवचले जायचे. इतर मुले त्याला त्रास द्यायची.

डिसऑर्डरमुळे कधी अभिनयाचा विचार केला नव्हता
शरद केळकरने सांगितले, "मी बालपणी अडखळत बोलत असे. त्यामुळे मला इतर मुले त्रास द्यायची. पण आता माझ्याकडे पहा, मी अशा व्यवसायात आहे जिथे मला माझे भाषण कौशल्य वापरावे लागते." या डिसऑर्डरमुळे कधी अभिनयाचा विचार केला नव्हता असे शरदने एका मुलाखतीत सांगितले होते.

या समस्येवर मात करण्यासाठी दोन वर्षे लागली
यापूर्वी शरद केळकरने 2020 मध्ये एका मुलाखतीत सांगितले होते की, "बरेच नकार मिळाले. मी अडखळत बोलायचो, त्यामुळे अभिनयाचा विचारही कधी मनात आला नव्हता. परंतु यामुळेच मला शक्ती मिळाली आणि चुकीच्या गोष्टी दुरुस्त करण्याचे सामर्थ्य दिले. अडखळत बोलणे ही एक समस्या होती, यावर मात करण्यासाठी मला दोन वर्षे लागली. मला वाटतं की, रिजेक्शन चांगल्यासाठी असतात. त्यामुळे तुमच्या आपले ध्येय गाठण्यासाठी कठोर परिश्रम करण्याची ताकद मिळते," असे शरदने म्हटले होते.

'द फॅमिली मॅन 2' ही वेब सीरिज रिलीज होऊन आता एक महिना झाला आहे. निर्माता-दिग्दर्शक राज निदिमोरू आणि कृष्णा डी.के. यांच्या या शोमध्ये शरदसह मनोज बाजपेयी, सामंथा अक्किनेनी, सीमा बिस्वास, सनी हिंदुजा, दर्शन कुमार, श्रेया धन्वंतरी, मिमे गुप्ता, प्रियमणी, शारिब हाश्मी आणि एन अलागमपेरुमल यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहेत.

बातम्या आणखी आहेत...