आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फॅमिली मॅन 2:रिलीजपूर्वीच डिलीट करण्यात आले होते सामंथा अक्किनेनीचे इंटिमेट सीन, को-स्टार शाहब अलीने इंटरव्ह्यूमध्ये केला खुलासा

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • सीरिजमधील बरेच सीन्स एडिट केले गेले होते.

'द फॅमिली मॅन 2' मध्ये खलनायक साजिदची भूमिका साकारणार्‍या शाहब अलीने एका मुलाखतीत खुलासा केला की, सीरिजमध्ये त्याचे आणि सामंथा अक्किनेनी यांचे काही इंटीमेट सीन्स होते. मात्र ते एडिटिंगवेळी वगळण्यात आले होते. याविषयी शाहब म्हणाला की, जे महत्त्वाचे सीन्स होते तेच ठेवण्यात आले.

बॉलिवूड हंगामाशी झालेल्या बातचीतमध्ये शाहबने सांगितले, "माझ्या मते, तेच सीन्स ठेवण्यात आले, ते महत्त्वाचे होते. जो भाग तर्कसंगत नव्हता, तो फायनल व्हर्जनमधून काढून टाकण्यात आला. सामंथा आणि माझ्यात काही जवळीक प्रसंग चित्रीत करण्यात आले होते, जिथे शेवटी (राजी आणि साजिद) प्रेमात पडतात. पण ते दृश्य क्रिएटिव्ह टीम किंवा कदाचित प्लॅटफॉर्मला समजले नव्हते. म्हणून ते सीन काढून टाकण्यात आले. बरेच सीन्स एडिट केले गेले होते, त्यामुळे ही मोठी गोष्ट नाही. ही एक प्रक्रिया आहे."

ते सत्य, ज्यामुळे सामंथा हैराण झाली होती
एका मुलाखतीत शाहबने सेटवरील सामंथासोबतच्या काही आठवणी शेअर केल्या. त्याने सांगितले होते, "दुस-या सीनझपुर्वीपर्यंत मला कार चालवता येत नव्हती. आणि या सीरिजमध्ये सहा ते सात ड्रायव्हिंग सीन्स होते. मला काही इंटेन्स डायलॉग्ससह पॅनिक मोडमध्ये कार चालवायची होती. माझ्यासाठी हे एखाद्या वाईट स्वप्नासारखे होते. प्रॉडक्शनच्या टीमने मला कार शिकण्यासाठी 15-20 मिनिटांचा अवधी दिला. आणि मग मी शूट करायला गेलो. मी पहिल्यांदाच कार चालवतोय, हे सामंथाला ठाऊक नव्हते. नंतर जेव्हा मी तिला हे सांगितले तेव्हा तिला धक्का बसला होता."

दहशतवाद्याच्या भूमिकेत शहाब-सामंथा
राज अँड डीके यांची निर्मिती असलेल्या या वेब सीरिजमध्ये सामंथा अक्किनेनी दहशतवादी आणि आत्मघाती बॉम्बर 'राजी' ची भूमिका साकारली असून शहाब हा तिचा साथीदार साजिदच्या भूमिकेत आहे. या वेब सीरिजमध्ये मनोज बाजपेयी गुप्तहेर श्रीकांत तिवारीच्या भूमिकेत आहे. याशिवाय सीमा बिस्वास, सनी हिंदुजा, दर्शन कुमार, श्रेया धनवंतरी, प्रियामणी, शारिब हाश्मी आणि एन. अल्गमपेरुमल या कलाकारांच्याही महत्त्वाच्या भूमिका यात आहेत. सामंथाच्या व्यक्तिरेखेमुळे तमिल ईलम आणि तमिळनाडूच्या लोकांनी वेब सीरिजला तीव्र विरोध दर्शवला होता.

बातम्या आणखी आहेत...