आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पतीवरील आरोपांवर अभिनेत्रीने केले भाष्य:'द फॅमिली मॅन' फेम प्रियामणी म्हणाली - मुस्तफाची पहिली पत्नी आयशाच्या आरोपामुळे आमच्या नात्यावर कोणताही परिणाम झाला नाही

3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • पहिल्या लग्नापासून मुस्तफाला दोन मुले

'द फॅमिली मॅन' या गाजलेल्या वेब सीरिजमध्ये झळकलेली प्रसिद्ध अभिनेत्री प्रियामणी हिच्या लग्नावरुन एक नवीन वाद सुरू झाला आहे. प्रियामणीने 2017 मध्ये मुस्तफा राजशी लग्न केले. पण आता या लग्नावर मुस्तफाची पहिली पत्नी आयशा हिने कोर्टात दावा केला आहे की, मुस्तफा आणि प्रियामणी यांचे लग्न बेकायदेशीर आहे. कारण ती मुस्तफाची पहिली पत्नी आहे, सोबतच तिचा आणि मुस्तफाचा अद्याप कायदेशीररित्या घटस्फोट झालेला नाही. पण आता एका मुलाखतीत प्रियामणीने तिच्या आणि मुस्तफाच्या नात्याबद्दल सांगितले आहे. मुस्तफा सध्या परदेशात असूनही आम्ही रोज एकमेकांशी बोलण्याच्या प्रयत्नात असतो, असे तिने सांगितले.

प्रियामणी म्हणाली की, संवाद खूप महत्वाचा आहे

प्रियामणी म्हणाली, "संवाद साधणे फार महत्वाचे आहे. जर तुम्ही मुस्तफा आणि माझ्या नात्याबद्दल विचारत असाल तर… आम्ही सध्या आमच्या नातेसंबंधात खूपच सुरक्षित आहोत, जरी तो सध्या अमेरिकेत असला, तरी आम्ही दररोज एकमेकांच्या कायम संपर्कात असतो आणि कायम एकमेकांशी बोलण्याच्या प्रयत्न करत असतो. जरी आमचे बोलणे झाले नाही, तर आम्ही एकमेकांना हाय किंवा हॅलो मेसेज तरी नक्की करत असतो. जर तो कामात व्यस्त असला तर कदाचित मला फोन करु शकत नाही. मात्र कामातून वेळ मिळताच तो मला मेसेज नक्की करतो. याउलट जर मी शूटिंगमध्ये बिझी असले तरी मीदेखील असेच करते."

प्रियामणीने पुढे सांगितल्यानुसार, मुस्तफा आणि ती कायम एकमेकांशी बोलण्याची संधी शोधत असतात. संवाद साधणे ही प्रत्येक नात्याची गुरुकिल्ली आहे, असे प्रियामणी सांगते.

मुस्तफाने 2017 मध्ये प्रियामणीसोबत केले लग्न
मुस्तफा आणि आयशा 2013 मध्ये विभक्त झाले. त्यानंतर 2017 मध्ये मुस्तफाने प्रियामणीसोबत लग्न केले. त्याने एका मुलाखतीत सांगितले होते की, आयशा त्याच्याकडून पैसे उकळण्याचा प्रयत्न करीत होती. यावर आयशाने म्हटले होते की, 'मुस्तफा अजुनही कायदेशीररित्या माझा पती आहे. मुस्तफा आणि प्रियामणी यांचे लग्न बेकायदेशीर आहे. जेव्हा त्याने प्रियामणीशी लग्न केले तेव्हा आम्ही घटस्फोटासाठी अर्जदेखील दाखल केला नव्हता. तो अविवाहित आहे असे त्याने कोर्टात सांगितले होते,' असे आयशाने सांगितले होते.

पहिल्या लग्नापासून मुस्तफाला दोन मुले
मुस्तफा आणि आयशा यांना दोन मुले आहेत. मुलांचा सांभाळ करण्यासाठी मी नियमितपणे आयशाला पैसे देत असतो. तिला फक्त माझ्याकडून पैसे पाहिजे. माझे आणि प्रियामणीचे लग्न 2017 मध्ये झाले. तर, आयशा इतके दिवस गप्प का होती?, असा प्रश्न मुस्तफाने उपस्थित केला आहे.

बातम्या आणखी आहेत...