आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दावा:'द फॅमिली मॅन 2' या वेब सीरिजसाठी मनोज बाजपेयीला 10 कोटी तर सामंथा अक्किनेनीला मिळाले 3-4 कोटींचे मानधन

14 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • या शोसाठी मनोज बाजपेयी आणि सामंथा अक्किनेनी यांना मिळालेल्या मानधनावरुन आता चर्चा रंगू लागली आहे.

मनोज बाजपेयी स्टारर 'द फॅमिली मॅन' चा दुसरा सीझन 4 जून रोजी प्रेक्षकांच्या भेटीला आला असून प्रेक्षकांकडून त्याला चांगला प्रतिसाद मिळाला आहे. या शोसाठी मनोज बाजपेयी आणि सामंथा अक्किनेनी यांना मिळालेल्या मानधनावरुन आता चर्चा रंगू लागली आहे.

'द फॅमिली मॅन सीझन 2' साठी मनोज बाजपेयीने 10 कोटी रुपये घेतल्याचे सांगण्यात येत आहे. त्याचबरोबर सामंथा अक्किनेनी हिला 3-4 कोटी रुपये मिळण्याचा दावा केला जात आहे. तर काही रिपोर्ट्समध्ये अन्य सूत्रांच्या हवाल्याने सांगितले गेले की, या शोसाठी मनोज बाजपेयीचे मानधन 8-9 कोटी तर सामंथाचे मानधन 2.5 कोटी इतके आहे. या वेब शोमधून दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री सामंथाने डिजिटल विश्वात पदार्पण केले आहे. यात तिने 'राजी' हे व्हिलनचे पात्र साकरले आहे.

'राजी'च्या पात्रासाठी सामंथाने घेतली दीड महिना कॉम्बॅट ट्रेनिंग
सामंथाच्या पात्राविषयी एका मुलाखतीत दिग्दर्शक सुपर्ण एस वर्मांनी सांगितले होते की, शोमध्ये तमिल रेबेल राजीच्या पात्रासाठी सामंथा अक्किनेनीने खूप प्रयत्न केले आहेत. निर्मात्यांनी आधी तिला एका पात्राचे स्केच पाठवले होते, ज्यासोबत त्या पात्राचा थोडा संदर्भही होता. जो पाहून सामंथाने लगेचच होकार दर्शवला. ज्यातील सर्व अॅक्शन सीन तिने स्वतः केलेले आहेत. कुठेच बॉडी डबलचा वापर करण्यात आलेला नाही. यासाठी तिने दीड महिना कॉम्बॅट ट्रेनिंग घेतली आहे.

पीएम बासूंच्या पात्रासाठी अनेक महिला राजकारण्यांकडून घेतली प्रेरणा
या वेब सीरिजवरुन बराच वादही रंगला आहे. या शोवर असा आरोप आहे की, यात पीएम बासू यांचे पात्र मुद्दाम सत्ताधारी पक्षाला खिजवण्यासाठी देण्यात आले असून ते त्यात विशेष बनवण्यात आले आहे. तसेच त्यांच्या सल्लागाराचे नावही असेच ठेवण्यात आले आहे. त्यातच लिट्चे पात्रही रुजवण्यात आले आहे. दिग्दर्शक सुपर्ण एस वर्मां यांनी मात्र हे आरोप खोटे ठरवले आहेत. सुपर्ण यांनी सांगितले, सीमा विश्वास यांनी साकारलेल्या पंतप्रधान बासू यांच्या पात्रासाठी अनेक राजकारण्यांकडून प्रेरणा घेतली आहे. विशेष म्हणजे वेशभूषेसाठी आम्ही सुषमा स्वराज, ममता बॅनर्जी आणि स्मृती ईराणी यांच्याकडून प्रेरणा घेतली आहे. आपल्या अनेक महिला राजकारणी आहेत, ज्यासाठी आम्ही यातील अनेक पात्रांचे थोडे थोडे चवीसारखे मिश्रण टाकले आहे.

सीरिजवरुन निर्माण झाला आहे वाद
या वेब सीरिजमध्ये तमिळ लोकांना चुकीच्या पद्धतीने दर्शवण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे.. तमिळ लोकांची नकारात्मक प्रतिमा या वेब सीरिजमुळे तयार होईल असा आरोप अनेकांनी केला. या वेब सीरिजचे कथानकामध्ये श्रीलंकेतील ईलम तमिळ समाजाला आणि ‘लिबरेशन टायगर्स ऑफ तामीळ ईलम’ (एलटीटीई) चुकीच्या अर्थाने दाखवण्यात आल्याचा आरोप करण्यात आला.

काही तमिळ लोकांनी या सीरिजला विरोध कायम ठेवला आहे. काहींनी तर या सीरिजवर बंदी आणण्याचीही मागणी केलीय. या सीरिजमध्ये तमिळ लोकांचा अनेकदा अपमान करण्यात आला असून तमिळ संस्कृतीचाही अवमान करण्यात आल्याचा दावा केला जातोय. तमिळ समाज हे सहन करणार नाही असे या सीरिजला विरोध करणाऱ्यांनी म्हटले आहे.

‘द फॅमिली मॅन 2’चे दिग्दर्शन सुपर्ण एस. वर्मा यांनी केले आहे. तर राज आणि डीके हे या सीरिजचे निर्माते आहेत. या सीरिजमध्ये मनोज बाजपेयी आणि सामंथा अक्किनेनीसोबतच प्रियामनी, शारिब हाश्मी, सीमा बिश्वास, दर्शन कुमार, शरद केळकर, सनी हिंदुजा, श्रेया धन्वंतरी, शहाब अली, वेदांत सिन्हा आणि महक ठाकूर महत्त्वपूर्ण भूमिकेत आहेत.

बातम्या आणखी आहेत...