आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

माधुरी दीक्षितचा डान्स व्हिडिओ:'दिल तो पागल है' चित्रपटाला 25 वर्षे पूर्ण, 'अरे रे अरे' गाण्यावर थिरकताना दिसली अभिनेत्री

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

यश चोप्रा यांच्या 'दिल तो पागल है' या चित्रपटाच्या रिलीजला नुकतीच 25 वर्षे पूर्ण झाली आहेत. हा चित्रपट 30 ऑक्टोबर 1997 रोजी प्रदर्शित झाला होता. या निमित्ताने चित्रपटातील मुख्य अभिनेत्री माधुरी दीक्षितने 'दिल तो पागल है' ची आठवण करून देणारा व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये माधुरी तिच्या आवडत्या अरे रे अरे या गाण्यावर थिरकताना दिसतेय. यादरम्यान तिने गुलाबी टॉपसह लाल पँट सूट घातला आहे, ज्यामध्ये ती खूप सुंदर दिसत आहे. हा व्हिडिओ शेअर करत माधुरीने कॅप्शनमध्ये लिहिले, 'माझ्या आवडत्या गाण्यासोबत 'दिल तो पागल है'ला 25 वर्षे पूर्ण झाल्याचा आनंद साजरा करतेय. तुमचे कोणते गाणे आवडते आहे', असे माधुरी म्हणाली आहे. सोशल मीडिया यूजर्स तिच्या या व्हिडिओवर लाइक्स आणि कमेंट्सचा पाऊस पाडत आहेत. पाहा व्हिडिओ...

बातम्या आणखी आहेत...