आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आतील तपशील:56 दिवसांत चित्रित झाला ‘जनहित में जारी’ चित्रपट; निर्माते आधी ‘लिटिल अंब्रेला’ ठेवणार होते नाव

मुंबई / उमेशकुमार उपाध्याय13 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

नुसरत भरुचाची भूमिका असलेला चित्रपट ‘जनहित में जारी’ १० जून २०२२ रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होत आहे. चित्रपटाचे निर्माते विनोद भानुशाली असून लेखक राज शांडिल्य आहेत. त्याचे शीर्षक आधी ‘लिटिल अंब्रेला’ होते. चित्रपटात नुसरत एक कंडाेम विकणाऱ्या कंपनीत काम करते, जेथे मुली कधीच नोकरी करत नव्हत्या. या प्रकारच्या कंपनीत नोकरी करताना काय आव्हाने असतात, नुसरत त्याला कसे तोंड देत लोकांना सांगते की लोकसंख्या खूप जास्त झाली आहे. कंडोम वापरणे किती आवश्यक आहे. हाच कथेचा सारांश आहे. निर्मात्यांनुसार, एक टॅबू तोडण्यासाठी हा चित्रपट तयार केला आहे. जसे की लोकसंख्या वाढती समस्या आहे. यामुळे कंडोम विकण्यासाठी मुलगा असो की मुलगी, त्यात कोणताही भेदभाव नसावा.

आज एखाद्या बारमध्ये मुलगी दारू देते तेव्हा लोक नकार देत नाही, मग कंडोम विकण्यास का घाबरता? लेखक राज म्हणतात, ‘आमच्या चित्रपटाचा जो विषय आहे त्यावर मुलींनी अद्याप काम केलेले नाही. एका मुलीसोबत अशा विषयावर काम करणे मोठी गोष्ट आहे. ‘जनहित में जारी’ सामान्य चित्रपट नाही, तर मनोरंजनासोबत एक संदेशही आहे, व्यावसायिकही आहे. यात ना व्हीएफएक्स, ना मारहाण, ना शिवीगाळ, ना अनावश्यक आयटम साँग आहे, तर यात एका गंभीर विचारावर मंथन आहे. आम्ही चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान २०० ते २५० पाकिटे कंडोम मागवली होती. हे चित्रीकरणावर अवलंबून होते की कोणत्या दृश्यात कंडोम दाखवायचे आहे.

पूर्ण शूटिंग मूळ लोकेशनवर झाली
चंदेरी, ग्वाल्हेर, ललितपूर, ओरछासह सर्व लोकेशन्सवर चित्रीकरण करण्यासाठी ५६ दिवस लागले. तसेच जवळपास १७ ते २० दिवस डबिंगला लागले. अशा प्रकारचे विषय थेट सांगणे कठीण असते. आम्ही विचार केला की हा थेट कसा सांगायचा, कोणते लोकेशन ठेवायचे ज्यात संपूर्ण भारत दिसेल. या गोष्टी लिहितानाच डोक्यात होत्या, मात्र पूर्ण चित्रपट लिहिला गेला तेव्हा चंदेरी आणि परिसरातील लोकेशन निवडले. चंदेरीत चित्रीकरणाच्या पहिल्या दिवशीच पाऊस आला. यामुळे तीन दिवस चित्रीकरण थांबवावे लागले, मग चित्रीकरण झाले. पूर्ण चित्रपट खऱ्या लोकेशनवर चित्रित झाला, मात्र आम्हाला चंदेरीत मंदिरातील भजनांमुळे लाइव्ह शूटिंगमध्ये खूप अडचणी आल्या म्हणून डबिंग नंतर झाले.

रविकिशनच्या जागी घेतले विजय राजला
‘विजय राजच्या भूमिकेसाठी आधी रविकिशनशी चर्चा सुरू होती, मात्र त्यांच्याकडे तारखा नसल्याने विजयला घेतले. चित्रपटाच्या डबिंग आणि एडिटिंगवर काम सुरू आहे. एडिट संपताच सेन्सॉर बोर्डाला कॉपी पाठवली जाईल. पुढच्या दहा दिवसांत तयारी केली जाईल. सुरुवातीला ८०० ते १००० स्क्रीनवर चित्रपट आणणार. प्रतिसाद वाढल्यानंतर आणखी स्क्रीन वाढवण्यात येतील.

गावाच्या सरपंचांनी सांगितले– अरे बापरे! घरात कंडोम विकताहेत
राजा यांनी पुढे सांगितले, आम्ही चंदेरीत जे घर चित्रीकरणासाठी घेतले होते, ते घर तेथील सरपंचाचे होते, मात्र जेव्हा कंडोम विकायची गोष्ट आली तेव्हा त्यांची प्रतिक्रिया होती की अरे बापरे! आमच्या घरात कंडोम विकत आहेत, त्यांना जेव्हा सर्व विषय सांगितला तेव्हा समजले आणि हा चांगला विषय असल्याचे सांगितले.

‘ड्रीम गर्ल’च्या सेटवर नुसरतला ऐकवली होती चित्रपटाची कथा
राजने सांगितले, मी ‘ड्रीम गर्ल’ची शूटिंग करत होतो तेव्हा नुसरतला ‘जनहित में जारी’ची कथा ऐकवली होती. एक दिवस दुपारच्या जेवणावेळी नुसरतला विचारले, कंडोमसारख्या विषयावर स्क्रिप्ट लिहीत आहे. विषय सांगताच नुसरत म्हणाली, मी हा चित्रपट नक्कीच करणार.

नुसरतला कंडोम विकताना बघून लोकांनी विचित्र प्रतिक्रिया दिल्या, चित्रीकरणाचे समजताच झाले गप्प
राज यांच्यानुसार, कंडोम विकणारी टीम बघून लोकांच्या प्रतिक्रिया विचित्र होत्या. थांबून पाहत होते की, ही मुलगी कोण आहे, कंडोम का विकत आहे. नंतर समजले की येथे चित्रीकरण सुरू आहे. तेथे मेडिकल दुकानदाराच्याही प्रतिक्रिया वेगळ्या होत्या, तर नुसरतला काहीच वाटत नव्हते. अशा खूप कमी अभिनेत्री असतात, ज्या अशा विषयांवर काम करायला तयार नसतात.

बातम्या आणखी आहेत...