आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करादिग्दर्शक एस. एस. राजामौली यांचा 'आरआरआर' हा चित्रपट येत्या 25 मार्च रोजी थिएटरमध्ये दाखल होणार आहे. या चित्रपटात रामचरण, ज्युनिअर एनटीआर, अजय देवगण आणि आलिया भट्ट यांच्या प्रमुख भूमिका आहेत. आरआरआर या चित्रपटासाठी कलाकारांनी तगडी रक्कम घेतली आहे. या चित्रपटासाठी कोणी किती मानधन घेतले ते जाणून घेऊया...
अभिनेता राम चरण या चित्रपटात मुख्य भूमिकेत आहे. रिपोर्ट्सनुसार, अभिनेत्याने हे पात्र साकारण्यासाठी तब्बल 45 कोटी रुपये आकारले आहेत.
या चित्रपटात सुपरस्टार ज्युनियर एनटीआरचीही मुख्य भूमिका आहे. या चित्रपटासाठी अभिनेत्याने तब्बल 45 कोटी रुपये मानधन घेतले आहे.
बॉलिवूड अभिनेता अजय देवगणने या चित्रपटातील भूमिकेसाठी 25 कोटी घेतले आहेत.
या चित्रपटात अभिनेत्री आलिया भट्टने सीतेची भूमिका साकारली आहे. यासाठी तिने 9 कोटी रुपये घेतले आहेत.
वृत्तानुसार, चित्रपटाचे दिग्दर्शक एस. एस. राजामौली यांनी चित्रपटाच्या कमाईतील 30% वाटा घेतला आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.