आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

बॉलिवूड राऊंडअप:ऑगस्टमध्ये प्रदर्शित होऊ शकतो ‘ब्रह्मास्त्र’चा फर्स्ट लूक; प्रेग्नेंट दिसण्यासाठी कृतिने वाढवले होते 15 किलो वजन 

मुंबई9 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • वाचा बॉलिवूडच्या महत्त्वाच्या तीन बातम्या..

रणबीर कपूर आणि आलिया भट्ट अभिनित ‘ब्रह्मास्त्र’चित्रपटाला खूप उशीर होत आहे. निर्मात्यांनी याला या वर्षी डिसेंबरमध्ये प्रदर्शित करण्याचा प्लॅन बनवला होता, परंतु, आताही हे शक्य होईल असे दिसत नाही. चित्रपटाचे दोन आठवड्यांचे चित्रीकरण अद्याप बाकी असल्याची माहिती आहे. यामुळे निर्माते हा २०२१ मध्ये प्रदर्शित करावा यासाठी चर्चा करत आहेत. टीमशी संबंधित एका सूत्राने सांगितले की, निर्माते याचा फर्स्ट लूक ऑगस्टमध्ये प्रदर्शित करू शकतात. या चित्रपटात रणबीर-आलियासोबत अमिताभ बच्चन, नागार्जुन आणि मौनी रॉयदेखील दिसणार आहेत.

  • इतके खाल्ले की, भूकच मिटली

कृति सेननने ‘मिमी’ चित्रपटासाठी 15 किलो वजन वाढवले होते, जे तिने लॉकडॉन दरम्यान कमी केले आहे. हे तिने कसे केले जाणून घेऊया तिच्याचकडून... 

‘गरोदरपणाचे दृश्य चित्रीत करताना आमच्या दिग्दर्शकांनी स्पष्ट सांगितले होते की, यासाठी वजन वाढवणे आवश्यक आहे. हे माझ्यासाठी मोठे काम होते. मला जेवणात कॅलरी आणि भूक वाढवायची आहे. हे मला माहीत होते. मी पूर्णपणे व्यायाम आणि योगादेखील बंद केला. सुरुवातीला याची खूप मजा वाटली, परंतु नंतर मला स्वत:सोबत जबरदस्ती करावी लागली, कारण भूकही लागत नव्हती. कसे तरी वजन वाढवले आणि नंतर लॉकडाऊनमध्ये माझ्या आहारतज्ञाच्या मदतीने वजन कमी केले.‘

  • ‘गल्ला गोरियां’मध्ये दिसणार जॉन आणि मृणाल ठाकूर

‘बाटला हाऊस’मध्ये एकत्र काम केलेले जॉन अब्राहम आणि मृणाल ठाकूर आता ‘गल्ला गोरियां’ या म्युझिक व्हिडिओमध्ये एकत्र दिसणार आहेत. टी-सिरीजच्या या नवीन पार्टी साँगला ध्वनी भानुशालीने गायले आहे. या गाण्याची रचना ब्रिटनमधील कोरिओग्राफर-गायक ताज याने केली आहे. या गाण्याबद्दल मृणाल सांगते, ‘मी प्रथमच असे टिपिकल नृत्य-गाणे करत आहे. यासाठी मला दोन आठवडे नृत्य शिकावे लागले. या चित्रीकरणादरम्यान जॉनने मला खूप मदत केली.‘

बातम्या आणखी आहेत...