आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करासलमान खान फिल्म्स प्रोडक्शनचा बहुचर्चित आणि बहुप्रतीक्षित चित्रपट 'अंतिम: द फाइनल ट्रुथ'च्या पहिल्या पोस्टरचे अनावरण आज करण्यात आले. या चित्रपटातून चाहत्यांना असलेल्या अपेक्षांची झलक या पोस्टरद्वारे मिळते आहे. सलमान खान आणि आयुष शर्मा एकमेकांच्या डोळ्यात डोळे घालून रोखून बघत आहेत. यावरून हे स्पष्ट आहे की ही लढाई अंतिम असेल. पोस्टरचे डिजाइन इंटेंस आहे आणि दोन प्रमुख पुरुषांमधला एक महाकाय संघर्ष यातून दिसतो आहे.
चित्रपट ‘अंतिम’चे कथानक मुख्यत्वे करून पोलीस आणि वेगवेगळ्या विचारधारांचे गँगस्टर यांच्या आसपास फिरते. दोन नायक असलेला हा चित्रपट पूर्णपणे दोन वेगवेगेळी विश्व आणि विचारधारांच्या दोन नायकांमधील संघर्षाला समोरा-समोर आणते, ज्यातून एक भयकंपित आणि अंगावर काटा आणणारा भयानक अंत पहायला मिळतो. सलमान खान आणि आयुष शर्मा पहिल्यांदाच सोबत स्क्रीन शेयर करताना दिसणार आहेत.
सलमान खान फिल्म्स द्वारा प्रस्तुत, ‘अंतिम’ सलमा खान द्वारा निर्मित आणि महेश मांजरेकर यांच्याद्वारे दिग्दर्शित आहे. या चित्रपटातून महिमा मकवाना बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. ‘अंतिम: द फाइनल ट्रुथ’ हा चित्रपट मराठी हिट चित्रपट ‘मुळशी पॅटर्न’चा हिंदी रिमेक आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.