आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

आठवणी:हिंदी चित्रपटातील पहिले गायक सुपरस्टार के.एल.सहगल यांची गोष्ट, ‘जब दिल ही टूट गया, हम जी के क्या करेंगे..’

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • लॉकडाऊनच्या काळात सर्वजण आठवणींचा प्रवास करत आहेत. अशातच ‘तुम्हाला माहीत आहे का?’ या कॉलममध्ये आम्ही तुम्हाला अशाच चित्रपट आणि त्यातील कलाकारांबाबत सांगणार आहोत. ज्यांच्या सुंदर आठवणी आजही तुमच्या मनात ताज्या आहेत.

‘यहूदी की लडकी’, ‘देवदास’ आणि ‘शाहजहां’ चित्रपटातून आपल्या अभिनयाची चुणूक दाखवणारे के.एल.सहगल यांची गायकाच्या रूपातील उंची इतकी मोठी होती की मुकेश-किशोर कुमार देखील त्यांना आपला गुरू मानत होते. लता स्वत:ला सहगल यांच्या भक्त मानायच्या. 

  • लहानपणी रामलीलामध्ये वाजवायचे सितार

11 एप्रिल 1904 रोजी जम्मूच्या नवाशहर येथील तहसीलदार अमरचंद सहगल यांच्या घरी कुंदनलाल सहगल यांचा जन्म झाला. त्यांची आई खूप धार्मिक होती. त्या कुंदन यांना भजन आणि कीर्तनाला स्वत:बरोबर घेऊन जायच्या. कुंदन लहानपणी रामलीलामध्ये सितार वाजवायचे. सहगल यांनी कोणत्याही गुरूंकडून संगीताचे शिक्षण घेतले नाही, परंतु सर्वप्रथम त्यांना सुफी संत सलमान युसूफ यांनी संगीत शिकवले होते. तरुणपणी त्यांनी शिक्षण अर्धवट सोडून रेल्वेमध्ये टाइमकीपरची नोकरी आणि त्यानंतर रेमिग्टन नावाच्या टाइपरायटिंग मशीनच्या कंपनीत सेल्समॅनची नोकरीदेखील केली होती.

  • 200 रुपये पगारावर स्टुडिओत केले काम

1930 मध्ये शास्त्रीय संगीतकार आणि संगीत दिग्दर्शक हरिश्चंद्र बाली हे सहगल यांना कोलकाताला घेऊन आले. बी.एन. सरकार यांनी त्यांचा फिल्म स्टुडिओ न्यू थिएटरमध्ये सहगल यांना 200 रुपये मासिक पगारावर काम करण्याची संधी दिली. तेथे त्यांची भेट संगीतकार आर.सी. बोराल यांच्या सोबत झाली. बोराल, सहगल यांच्या प्रतिभेने खूप प्रभावित झाले. हळूहळू सहगल आपली ओळख निर्माण करत गेले.

  • सहगल यांच्या चित्रपटातून झाली पार्श्वगायनाची सुरुवात

दूरदर्शनचे प्रसिद्ध निर्माता आणि लेखक शरद दत्त यांनी त्यांचे पुस्तक ‘कुंदन : सहगल का जीवन और संगीत’ यात सांगितले आहे की, 1936 मध्ये नितीन बोस दिग्दर्शित ‘धूप-छांव’ चित्रपटातील दोन गाणी खूप लोकप्रिय झाली होती. ‘अंधे की लाठी तू ही है’ आणि ‘जीवन का सुख’ ही ती गाणी होती. ही गाणी केसी डे यांनी गायली होती आणि त्यांच्यावरच ती चित्रीत करण्यात आली होती, परंतु नंतर ग्रामोफोन रेकॉर्डसाठी ही गाणी कुंदनलाल सहगल यांच्याकडून गाऊन घेतली. नितीन बोस यांनी संगीतकार आर. सी. बोराल आणि पंकज मलिक आणि साउंड रेकॉर्डिस्ट मुकुल बोस यांच्या मदतीने गाणे रेकार्ड करून पार्श्वगायन करण्याचा पहिला प्रयोग केला होता ही या चित्रपटाची खास गोष्ट आहे. एक दिवस सकाळी पंकज मलिक त्यांना भेटायला घरी आले तर ते आंघोळ करताना रेडिओवर सुरू असलेल्या गाण्याशी सूर मिळवत गाणे गात होते. यानंतर नितीन यांनी मलिक यांना सल्ला दिला की ज्याप्रकारे ते रेडिओशी आवाज मिळवून गाणे गात होते त्याप्रकारे असा प्रयोग चित्रपटातील गाण्यांच्या रेकॉर्डिंगपूर्वी करता येऊ शकते. चित्रीकरणाच्यावेळी अभिनेता रेकॉर्डिँग ऐकून त्यानुसार ओठ हलवून अभिनय करू शकत होते. याप्रकारे सहगल यांनी त्यांच्या या चित्रपटापासून पार्श्वगायनाची सुरुवात केली.

  • सहगल यांचा चित्रपट पाहून लता म्हणाल्या, लग्न करेल तर यांच्याशीच...

राष्ट्रीय पुरस्कार मिळालेले पुस्तक ‘लता: सूर-गाथा’मध्ये लता मंगेशकर यांनी स्वत:ला के.एल. सहगल यांचे भक्त असल्याचे सांगितले आहे. त्यांनी सहगलसोबतच्या अपूर्ण राहिलेल्या इच्छेचाही खुलासा केला आहे. यतींद्र मिश्रच्या या पुस्तकात लता यांनी सांगितले की त्यांची के. एल. सहगल यांच्यासोबत कधीच भेट झाली नाही. त्यांनी सांगितले,‘मी त्यांना कधीच भेटू शकले नाही. मी सहगल साहेबांची जी प्रतिमा तयार केली, ती चित्रपट पाहून आणि त्यांची गाणी ऐकून तयार केली आहे. आमचे संपूर्ण कुटुंब सहगल यांचे भक्त आहे. लहानपणी मी गाणे शिकत होते आणि वडीलही उपस्थित होते, त्यावेळी मनात एक तीव्र इच्छा होती की, जर कधी संधी मिळाली तर सहगल साहेबांसोबत नक्की गाणे गाणार. त्यांच्यासोबत गायला मिळाले नाही तर कमीत कमी त्यांना समोरासमोर बघेन आणि आग्रह करून गाणे नक्की ऐकवेल. पण, मी त्यांना पाहू आणि भेटूही शकले नाही याची मला खंत आहे.’ लता मंगेशकर यांनी सहगल याचा ‘चंडीदास’ चित्रपट पाहून म्हटले होते की, त्यांना सहगल यांच्याशी लग्न करायचे आहे.

  • ‘सिंहासन आणा, मी सिंहासनावर बसूनच गातो, रिहर्सलमध्ये घेतले आठ पेग

सहगल यांचे दारू पिणे खूप चर्चेचा विषय होता. ते न पिता कोणतेही गाणे रेकॉर्ड करत नव्हते. ‘शहांजहां’ चित्रपटातील एका गाण्याचे रेकॉर्डिंग होणार होते. या चित्रपटाचे संगीतकार नौशाद होते. नौशाद यांचे आत्मचरित्र ‘जर्रा जो आफताब बना’ यात चौधरी इमाम लिहितात, ‘शहाजहां’चे चित्रीकरण सुरू झाले होते. नौशाद साहेब आणि मधोक साहेब त्यांच्या खोलीत बसले होते. तेवढ्यात एक व्यक्ती खोलीत आली. मधोक साहेब नौशाद साहेबांशी त्यांची ओळख करून देताना म्हणाले,‘हे के. एल. सहगल आहेत.’ चित्रपटातील गाण्यांचे रेकॉर्डिंग सहा वाजता सुरू झाले होते. नौशाद साहेबांनी खुर्ची आणायला सांगितली होती. तर, सहगल साहेब म्हणाले, ‘सिंहासन आणा. मी सिंहासनावर बसून गातो.’ नंतर सिंहासन आणले गेले आणि रेकाँर्डिंगदरम्यान सहगल हे आठ पेग प्यायले. नौशाद, सहगल यांच्यासोबत प्रथमच काम करत होते. त्यांना हे पाहून खूप आर्श्चय वाटले होते. रात्रीचे तीन वाजले होते. नौशाद साहेबांना सहगल यांनी विनंती केली की, आता तुम्ही आराम करा. रेकाँर्डिग उद्या करू. म्यझिशियन थकले आहेत.’

  • 185 गाणी सहगल यांनी आपल्या दोन दशकांतील कारकिर्दित गायली. ज्यामध्ये 142 चित्रपटांतील, 43 गैर फिल्मी

सर्वांत लोकप्रिय 5 गाणी
 

♦ जब दिल ही टूट गया... ♦ बाबुल मोरा, नैहर छूटो ही जाए... ♦ एक बंगला बने न्यारा ♦ गम दिए इतने मुस्तकिल, इतना नाजुक है दिल... ♦  सो जा राजकुमारी सो जा...

  • 1947 मध्ये सहगल यांच्या दारूच्या व्यसनामुळे 16 जानेवारी रोजी वयाच्या 43 व्या वर्षी त्यांचे निधन झाले. त्यांच्या मृत्यूनंतर बी.एन.सरकार यांनी त्यांच्या जीवनावरील एक वृत्त ‘अमर सहगल’ची निर्मिती केली होती.
  • 1936 मध्ये आलेल्या ‘देवदास’ आणि ‘बलम आए बसो मोरे मन में’ चित्रपटातील गाण्यांमुळे लोकप्रियता मिळाली. त्यांचा पहिला नॉन फिल्मी अलबम ‘झूलाना झुलाओ री’च्या पाच लाख रेकॉर्ड विकल्या गेल्या.ही खूप मोठी गोष्ट होती. कारण त्यावेळी खूप कमी लोकांजवळ रेकॉर्ड प्लेअर होते.
बातम्या आणखी आहेत...