आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कोरोनामुळे बॉलिवूडने गमावला आणखी एक अभिनेता:'द गाझी अटॅक'मधील अभिनेते मेजर बिक्रमजीत कंवरपाल यांचे निधन, वयाच्या 52 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

13 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यापूर्वी बिक्रमजीत हे आर्मी ऑफिसर होते.

बॉलिवूड अभिनेते मेजर बिक्रमजीत कंवरपाल यांचे निधन झाले आहे. 52 वर्षीय बिक्रमजीत यांना कोरोनाचा संसर्ग झाला होता. शुक्रवारी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाने चित्रपटसृष्टीमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे.

चित्रपट निर्माते अशोक पंडीत यांनी बिक्रमजीत यांच्या निधनाची माहिती सोशल मीडिया पोस्टद्वारे दिली आहे. ‘कोरोनामुळे अभिनेते बिक्रमजीत कंवरपाल यांचे निधन झाल्याचे ऐकून दु:ख झाले. माजी सैन्य अधिकारी बिक्रमजीत यांनी अनेक चित्रपट आणि टीव्ही मालिकांमध्ये सहाय्यक भूमिका साकारल्या होत्या,’ असे लिहित त्यांनी श्रद्धांजली वाहिली आहे.

'पेज 3' आणि 'द गाझी अटॅक' सारख्या चित्रपटांमध्ये झळकले होते
बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यापूर्वी बिक्रमजीत हे आर्मी ऑफिसर होते. 2003 मध्ये त्यांनी बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. त्यांनी 'पेज 3', 'कॉर्पोरेट', 'रॉकेट सिंह : सेल्समॅन ऑफ द ईयर', 'आराक्षण', 'जब तक है जान', 'क्या सुपर कूल हैं हम', 'हे बेबी', 'हेट स्टोरी 2', '2 स्टेट्स', 'प्रेम रतन धन पायो' आणि 'द गाझी अटॅक' अशा अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. तसेच त्यांनी अनेक मालिकांमध्येही काम केले आहे. चित्रपटांमध्ये ते आर्मी ऑफिसर आणि पोलिस अधिका-याची भूमिकेत अधिक दिसले होते.

याशिवाय ते '24', 'अदालत', 'दिया और बाती हम', 'सियासत', 'कसम तेरे प्यार की' आणि 'ये हैं चाहतें'’ या मालिकांमध्ये त्यांनी भूमिका साकारल्या होत्या. सेप्शल ऑप्स या वेब सीरिजमध्ये ते महत्त्वाच्या भूमिकेत झळकले होते.

कोरोनामुळे बॉलिवूडने गमावले अनेक कलाकार
एंटरटेन्मेंट इंडस्ट्रीशी संबधित अनेक लोकांचे कोरोनामुळे निधन झाले आहे. यामध्ये नदीम-श्रावण जोडीतील संगीतकार श्रवण राठोड, 'जिस देश में गंगा रहता है'मधील अभिनेते किशोर नांदलस्कर, सिनेमॅटोग्राफर के.व्ही. आनंद, एडिटर वामन भोसले आणि 'महाभारत' या मालिकेत इंद्रची भूमिका साकारणारे अभिनेते सतीश कौल यांच्यासारख्या अनेक दिग्गजांचा समावेश आहे.

बातम्या आणखी आहेत...