आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Entertainment
  • Bollywood
  • The Hindi Remake Of Ranveer Singh Starrer Annian, Stuck In Legal Trouble, The Producers Of The Original Film Will Go To HC Against Shankar And Jayantilal Gada

रिमेक अडचणीत:कायदेशीर कचाट्यात सापडला रणवीर सिंह स्टारर अन्नियनचा हिंदी रिमेक, शंकर आणि जयंतीलाल गडाविरोधात HC जाणार निर्माते

2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • रविचंद्रन हे मद्रास उच्च न्यायालयात अर्ज दाखल करणार आहेत.

बॉलिवूड दिग्दर्शक शंकर आणि निर्माते जयंतीलाल गडा अभिनेता रणवीर सिंहसोबत अन्नियन या चित्रपटाचा हिंदी रिमेक बनवण्याच्या तयारीत होते. पण आता हा चित्रपट कायदेशीर कचाट्यात सापडला आहे. 2006 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘अन्नियान’ उर्फ ‘अपरिचित’ या तामिळ चित्रपट हा हिंदी रिमेक होता. मात्र ‘अपरिचित’ या चित्रपटाचा हिंदी रिमेक बनवल्यामुळे या चित्रपटाचे निर्माते ऑस्कर रविचंद्रन यांनी दिग्दर्शक शंकर आणि निर्माते जयंतीलाल गडा यांच्या विरोधात न्यायालयात जाण्याचा निर्णय घेतला आहे.

दरम्यान, या आधीच रविचंद्रन यांनी शंकर यांच्याविरोधात साऊथ इंडियन फिल्म चेंबर ऑफ कॉमर्सकडे तक्रार दाखल केली आणि दावा केला की समिती लवकरच त्यांना या प्रकरणात समर्थन देणार आहे.

एका मुलाखतीत रविचंद्रन यांनी या चित्रपटाविषयी सांगितले, ‘मी शंकर आणि जयंतीलाल गडा यांच्या विरोधात न्यायालयात जाणार आहे. ते माझ्या संमतीशिवाय चित्रपट बनवू शकत नाही, कारण माझ्याकडे चित्रपटाचा कॉपीराइट आहे आणि इतर कोणत्याही व्यक्तीकडे या चित्रपटाविषयी कोणताही अधिकार नाही, कारण या चित्रपटाचा लेखक मी आहे.’

तर दिग्दर्शक शंकर यांनी दावा केला की, ‘अन्नियान’ ही माझी स्क्रिप्ट आहे आणि प्रत्येकाला त्याबद्दल माहिती आहे. ते काहीही बोलू शकतात आणि हक्क दाखवू शकतात, पण प्रत्येकाला माहित आहे की ‘अन्नियान’ हा माझा चित्रपट आहे आणि मी त्याला चित्रपटाच्या दिग्दर्शनासाठी नियुक्त केले होते.

रविचंद्रन हे मद्रास उच्च न्यायालयात अर्ज दाखल करणार आहेत. पुढे ते म्हणाले की, 'एसआयएफसीसी, ते मला पाठिंबा देत आहेत, त्यांनी मला थोडा वेळ थांबायला सांगितले कारण त्यांनी मुंबईतील फिल्म असोसिएशनशी या विषयी चर्चा केली आहे. पण चित्रपटाचे निर्माते शंकर नसून जयंतीलाल गडा आहेत आणि ज्यांच्याशी मला या प्रोजेक्ट विषयी चर्चा करण्याची गरज आहे.’

रणवीर सिंहने सोशल मीडियावर शेअर केली होती पोस्ट
शंकर आणि जयंतीलाल यांनी एप्रिल 2021 मध्ये रणवीर सिंहसोबत अन्नियाचा हिंदी रिमेक बनवण्याची घोषणा केली होती. अभिनेता रणवीर सिंहनेदेखील शंकर आणि जयंतीला गडा यांच्यासोबतचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला होता.

बातम्या आणखी आहेत...