आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Entertainment
  • Bollywood
  • The Imortal Ashwatthama: Vicky Kaushal Sara Ali Khan Starrer Film Get Shelved Due To Budget Issues, Shooting Of The Film Was To Start From August

द इम्मोर्टल अश्वत्थामा:विकी कौशल-सारा अली खान स्टारर चित्रपट बजेटच्या अडचणींमुळे रखडला, सप्टेंबरपासून सुरू होणार होते चित्रपटाचे शूटिंग

2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • हा चित्रपट महाभारतातील अश्वत्थामा या पात्रावर आधारित होता.

बॉलिवूड अभिनेता विकी कौशल आणि अभिनेत्री सारा अली खान हे गेल्या अनेक दिवसांपासून 'द इम्मोर्टल अश्वत्थामा' या चित्रपटामुळे चर्चेत आहेत. 'उरी' या चित्रपटाचे दिग्दर्शक आदित्य धर यांचा हा चित्रपट महाभारतातील अश्वत्थामा या पात्रावर आधारित होता. पुढील महिन्यापासून चित्रपटाचे शूटिंग सुरू होणार होते, पण आता हा चित्रपट रखडला असल्याचे वृत्त आले आहे. चित्रपट थंड बस्त्यात जाण्यामागचे कारण चित्रपटाचे मोठे बजेट असल्याचे सांगितले जात आहे. बजेटच्या अडचणीमुळे निर्मात्यांनी हा चित्रपट थांबवण्याचा निर्णय घेतला आहे.

अलीकडेच आलेल्या ई-टाइम्सच्या रिपोर्टनुसार, बजेटच्या अडचणींमुळे हा चित्रपट थांबवण्यात आला आहे. यापूर्वीदेखील विविध कारणांमुळे हा चित्रपट आधीच पुढे ढकलण्यात आला आहे. 'इम्मोर्टल अश्वत्थामा'हा सध्या बनवल्या जाणाऱ्या सर्वात महागड्या बॉलिवूड चित्रपटांपैकी एक होता, हा चित्रपट भव्यदिव्य करण्यासाठी निर्माते अनेक मोठ्या लोकांना कास्ट करण्याचा विचार करत होते. चित्रपटात महत्त्वाची भूमिका साकारण्यासाठी दिग्दर्शक आदित्य धर यांनी सुनील शेट्टी यांच्याशी केलेली चर्चाही अंतिम टप्प्यावर होती.

कोरोनाची दुसरी लाट आल्यामुळे चित्रपट पुढे ढकलण्यात आला होता

हा सुपरहिरो चित्रपट भारत, आइसलँड आणि यूएईमध्ये शूट केला जाणार होता. निर्मात्यांना ऑगस्टपासून चित्रपटाचे शूटिंग सुरू करायचे होते, मात्र कोविड 19 ची दुसरी लाट आल्यानंतर शूटिंग पुढे ढकलण्यात आले होते. निर्माते सप्टेंबरपासून शूटिंग सुरू करणार होते, पण त्याआधीच चित्रपट थंड बस्त्यात गेल्याच्या बातम्या आल्या आहेत.

बातम्या आणखी आहेत...