आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Entertainment
  • Bollywood
  • The Incarnation Sita: Ranveer Singh Will Play The Role Of Lankesh Ravana In Kangana Ranaut Starrer Sita, Discussions With The Makers Have Been Going On For Several Weeks.

कास्टिंग कॉल:कंगना रनोट स्टारर 'सीता'मध्ये रावणाची भूमिका साकारणार रणवीर सिंह, निर्मात्यांसोबत अनेक आठवड्यांपासून सुरु आहे चर्चा

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • ‘सीता’ चित्रपट हा एक मायथोलॉजिकल ड्रामा आहे.

बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनोट हिने अलीकडेच दिग्दर्शक अलौकिक देसाई यांचा बिग बजेट पौराणिक चित्रपट 'द इनकारेशन - सीता' साईन केला आहे. या चित्रपटात कंगना रनोट माता सीतेच्या भूमिकेत दिसणार आहे. कंगनाने या चित्रपटाचे पोस्टर तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केले आहे. हे पोस्टर शेअर करत ‘द इनकारेशन सीता’ या चित्रपटात काम करायला मिळत असल्याने आनंद झाला आहे. सीता राम यांच्या आशीर्वादाने…जय सियाराम’, असे कॅप्शन कंगनाने दिले आहे.

याच चित्रपटात 'पद्मावत'मध्ये अलाउद्दीन खिलजीची नकारात्मक भूमिका साकारणारा अभिनेता रणवीर सिंह रावणाच्या भूमिकेत दिसणार असल्याची चर्चा आहे.

फिल्मफेअरच्या वृत्तानुसार, 'द इनकारेशन - सीता' या चित्रपटाच्या निर्मात्यांनी रणवीर सिंहकडे चित्रपटात लंकेश रावणाची भूमिका साकारण्यासाठी संपर्क साधला आहे. ही ऑफर अभिनेत्याला मे महिन्यात देण्यात आली होती, त्यानंतर निर्माते आणि त्याच्यात चर्चा सुरू आहे. सध्या रणवीर चित्रपटाच्या फायनल नेरेशनची वाट पाहत आहे. रणवीर या चित्रपटासाठी आणि भूमिकेसाठी खूप उत्साहित असल्याचे म्हटले जात आहे.

काही रिपोर्ट्सनुसार, सीता हा एक बिग बजेट चित्रपट असणार आहे, जो बाहुबली सारखा बनवला जाईल. कंगनाच्या आधी करीना कपूर खानला या चित्रपटातील माता सीतेची भूमिकेसाठी विचारणा झाली होती. मात्र तिने मागितलेले मानधन खूप जास्त असल्याने तिच्या ऐवजी कंगनाला चित्रपटात घेण्यात आले आहे. चित्रपटाचे संवाद आणि गीत मनोज मुंतशीर यांनी लिहिले आहेत, तर सलोनी शर्मा आणि अंशिता देसाई यांनी निर्मिती केली आहे

‘सीता’ चित्रपट हा एक मायथोलॉजिकल ड्रामा आहे. अलौकिक देसाई या चित्रपटाचे दिग्दर्शन करणार आहेत. हिंदीसोबतच हा चित्रपट तामिळ, तेलुगु, मल्याळम आणि कन्नड भाषांमध्ये प्रदर्शित केला जाणार आहे.

या चित्रपटांमध्ये दिसणार आहे रणवीर
'सीता' व्यतिरिक्त रणवीर सिंहकडे अनेक मोठ्या चित्रपटांच्या ऑफर आहेत. रणवीरने नुकताच करण जोहर दिग्दर्शित 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' हा चित्रपट साइन केला आहे, ज्यात 'गली बॉय' चित्रपटातील त्याची सह-कलाकार आलिया भट्ट मुख्य भूमिकेत आहे. याशिवाय रणवीर संजय लीला भन्साळींच्या 'बैजूबावरा'मध्येही दिसणार आहे. '83' हा चित्रपट देखील लवकरच चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे जो गेल्या एक वर्षापासून कोरोनामुळे पुढे ढकलण्यात आला आहे.

बातम्या आणखी आहेत...