आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मूवी रिव्ह्यू:फक्त खेळावर नव्हे, मानवी हक्कांवर आधारित 'रश्मी रॉकेट'

3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • हा चित्रपट फक्त खेळांवर आधारित नाही तर मानवी हक्कांचा आवाज आहे.

रिलीज डेट: 15 ऑक्टोबर 2021
लेखक: नंदा परियासामी
निर्माता: रोनी स्क्रूवाला, नेहा आनंद, प्रांजल खांघदिया
दिग्दर्शक: आकर्ष खुराना
कलाकार: तापसी पन्नू, प्रियांशु पैन्युली, अभिषेक बनर्जी, सुप्रिया पाठक, मनोज जोशी, श्वेता त्रिपाठी, सुप्रिया पिळगावकर, वरुण बडोला
म्युझिक डायरेक्टर: अमित त्रिवेदी
जॉनर: स्पोर्ट्स, कोर्टरूम ड्रामा
प्लेटफॉर्म: झी 5
स्टार: 3/5 (तीन स्टार)

तापसी पन्नू हिच्या भूमिकेने सजलेला ‘रश्मि रॉकेट’ चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाला. हा चित्रपट खेळ जगतात होणाऱ्या लिंग चाचणीवर आधारित आहे.

कथा: कथा रश्मी (तापसी) पासून सुरू होते. ती आपल्या गावात सर्वात वेगाने धावणारी मुलगी असते. त्यामुळे तिला सर्व प्रेमाने रश्मी रॉकेट संबोधतात. पुढे जाऊन रश्मी खेळात आपले करिअर बनवते. नंतर तिला लिंग चाचणीला सामोरे जावे लागते. खेळ संघटना खेळाडू महिलासोबत लिंग चाचणीच्या नावावरुन अति करतात. महिला खेळाडूंनी थोडीही ताकत दाखवली तरी तिच्यावर आक्षेप घेतला जातो. मग महिला खेळाडूंना कोणत्या अडचणींमधून जावे लागते, त्यांच्या ओळखीवर मनावर किती जखमा होतात, त्यांची मनस्थिती दाखवण्याचा प्रयत्न चित्रपटातून करण्यात आला आहे. नंतर, वकील (अभिषेक बॅनर्जी) रश्मीला असोसिएशनमधून काढून टाकण्याच्या विरोधात न्यायालयात आव्हान देतात. न्यायालयातील नाट्य मजेशीरपणे मांडण्यात आले आहे.

अभिनय : अभिनयाविषयी बोलायचं झाले तर तापसीने वेगवान रश्मीचे पात्र जीवंत केले आहे. त्यात तिने कोणतीच कमी सोडली नाही. एक धावपटू ते गरोदर महिलेचे पात्र तिने खूपच दमदार पद्धतीने साकारले आहे. दुसरीकडे तिच्या पतीच्या भूमिकेत प्रियांशु पेन्युलीने जीव ओतला आहे. तर अभिषेक बनर्जीने वकिलाची चांगली भूमिका साकारली आहे. चित्रपटाचा हाइलाइट प्वाइंट अभिषेकचा अभिनय आहे. काही-काही ठिकाणी अभिषेकच्या अभिनयाचा चित्रपटाला फायदा झाला आहे.

दिग्दर्शन : चित्रपटाचे नाव जरी ‘रश्मी रॉकेट’ असले तरी कथा खूपच हळू-हळू सरकते. ‘रश्मी रॉकेट’ चित्रपट पाहिल्यानंतर तुम्हाला भारतीय धावपटू दुत्ती चंद यांची आठवण येईल. कारण याची कथादेखील त्याचे करिअर आणि उद्भवलेल्या वादाशी मिळता-जुळता आहे. मात्र दिग्दर्शकाने सर्जनशील स्वातंत्र्य राखले आहे. विशेष करुन कोर्टरूममध्ये, या भागाला चांगली स्पेस देण्यात आली आहे. हा एक दमदार मुद्दा असूनही चित्रपटाचे संवाद हवे तसे दमदार नाहीत. चित्रपटातील तापसीचे धावण्याचा भाग आणखी चांगला होऊ शकला असता.

विशेष: हा चित्रपट फक्त खेळांवर आधारित नाही तर मानवी हक्कांचा आवाज आहे.

बातम्या आणखी आहेत...