आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करा11 मार्च रोजी रिलीज झालेल्या 'द कश्मीर फाइल्स' या चित्रपटाने आठव्या दिवशी 19 कोटींचा व्यवसाय करून विक्रम केला आहे. 12 कोटींच्या अतिशय छोट्या बजेटमध्ये या चित्रपटाची निर्मिती करण्यात आली आहे, रिलीजच्या आठ दिवसांतच या चित्रपटाने 100 कोटींहून अधिकचा गल्ला तिकिटबारीवर जमवला आहे. रिलीजच्या अवघ्या 6 दिवसांत चित्रपटाला पाच पट रेट ऑफ रिटर्न मिळाले आहे. दरम्यान, कोरोना कालावधीनंतर प्रदर्शित झालेले चित्रपट आणि त्यांच्या कलेक्शनवर एक नजर टाकुया-
आलिया भट्ट, शंतनू माहेश्वरी आणि अजय देवगण स्टारर गंगूबाई काठियावाडी हा चित्रपट 25 फेब्रुवारी रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला. हा चित्रपट 100 कोटींच्या बिग बजेटमध्ये बनवला गेला आहे. या चित्रपटाने रिलीजच्या तीन आठवड्यानंतरही केवळ 171.80 कोटींची कमाई केली आहे. चित्रपटाचा 100% परतावा देखील जमा झालेला नाही.
रोहित शेट्टी दिग्दर्शित 'सूर्यवंशी' या चित्रपटाने पहिल्याच दिवशी 29.26 कोटींचे ओपनिंग कलेक्शन केले होते. हा चित्रपट कोरोना कालावधीनंतरचा सर्वात मोठा ओपनिंग चित्रपट होता. चित्रपटाने 294 कोटींची कमाई केली होती.
रणवीर सिंग, दीपिका पदुकोण स्टारर '83' हा चित्रपट कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत प्रदर्शित झाला. 16 कोटी ओपनिंग असलेला हा चित्रपट कोरोनाच्या काळात प्रदर्शित झालेला दुसरा सर्वात मोठा बॉक्स ऑफिस ओपनर होता. देशभरातील अनेक राज्यांतील चित्रपटगृहे बंद असताना हा चित्रपट प्रदर्शित झाला. याचा परिणाम असा झाला की या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर केवळ 120 कोटींचे कलेक्शन केले. चित्रपटाने निर्मिती खर्चाच्या केवळ निम्मी कमाई केली.
भूमी पेडणेकर आणि राजकुमार राव स्टारर 'बधाई दो'चे बॉक्स ऑफिस कलेक्शन 28 कोटी होता, तर त्याचा निर्मिती खर्च 35 कोटी इतका होता. चित्रपटाला मोठा तोटा सहन करावा लागला.
जॉन अब्राहम, दिव्या खोसला कुमार स्टारर सत्यमेव जयते 2 हा चित्रपट 25 नोव्हेंबर 2021 रोजी प्रदर्शित झाला. अक्षय कुमारच्या सूर्यवंशीसोबत या चित्रपटाची बॉक्स ऑफिसवर टक्कर झाली, ज्यामुळे चित्रपटाच्या कलेक्शनवर परिणाम झाला. चित्रपटाने केवळ 19 कोटींची कमाई केली. चित्रपटाला 80 टक्के तोटा सहन करावा लागला. एकुण निर्मिती खर्चातून चित्रपटाला केवळ 20 टक्के परतावा मिळू शकला.
राणी मुखर्जी, सैफ अली खान स्टारर 'बंटी और बबली 2' हा चित्रपट 19 नोव्हेंबर 2021 रोजी प्रदर्शित झाला होता. खराब रिव्ह्यू असूनही हा चित्रपट 65 कोटींचा गल्ला जमवण्यात यशस्वी ठरला. चित्रपटाला बजेटच्या 105 टक्के परतावा मिळाला.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.