आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'द कश्मीर फाईल्स'च्या कृष्णा पंडितचा इंटरव्ह्यू:काश्मिरी पंडित महिलेला पतीच्या रक्ताने शिजवलेला भात खायला दिला होता, हे ऐकून माझे मन सून्न झाले होते

उमेशकुमार उपाध्याय3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • कसा होता दर्शनचा एकुण अनुभव वाचा -

'द कश्मीर फाइल्स' या चित्रपटात कृष्णा पंडितची भूमिका साकारणारा अभिनेता दर्शन कुमारच्या मनावर चित्रपटाचा एवढा खोलवर परिणाम झाला की, तो नैराश्यात येऊन एकटाच बडबड करायचा. कित्येक रात्री तो झोपू शकला नाही. चित्रपट साइन करण्यापासून ते शुटिंगपर्यंतचा दर्शनचा प्रवास नेमका कसा राहिला, हे दिव्य मराठीने त्याच्याकडून जाणून घेतले आहे -

पीडितांचे व्हिडिओ दाखवून चित्रपटाची ऑफर दिली गेली -
मला कास्टिंग डायरेक्टर तरण बजाज यांचा फोन होता. त्यांनी सांगितले की, मी चित्रपटात मुख्य भूमिका साकारावी अशी विवेक रंजन यांची इच्छा आहे. मी विवेक आणि पल्लवीजींना भेटलो. त्यांनी मला एक तासाचा एक व्हिडिओ दाखवला, ज्यामध्ये त्यांनी देश आणि जगभर प्रवास करुन पीडितांचे व्हिडिओ बनवले होते. ते व्हिडिओ पाहून मी थक्क झालो, मी काहीच बोलू शकलो नाही. ते म्हणाले की, मी तुझी अवस्था समजू शकतो. एक काम करा, तू ही स्क्रिप्ट घे आणि वाचून निर्णय घे. स्क्रिप्टमध्ये ज्या काही गोष्टी आणि वेदना लोकांनी व्यक्त केल्या आहेत, त्या संवादात मांडल्या आहेत. हा चित्रपट करण्यामागचे माझे मुख्य कारण तेच होते.

व्हिडिओ पाहून धक्काच बसला
व्हिडिओ सुरू होताच, पहिलेच दृश्य पाहून मला रडू कोसळले. अनेक कुटुंबे स्वतःबद्दल सांगत होती. एके ठिकाणी पतीची हत्या करून त्याच्या रक्ताने शिजवलेला भात पत्नीला खाऊ घातला गेला होता, ते पाहून मला धक्काच बसला. माझे मन सून्न झाले होते.

अनेक रात्री मी झोपू शकलो नाही
स्क्रिप्ट वाचण्यापासून ते चित्रपट करण्यापर्यंतचा दोन महिन्यांचा प्रवास होता. व्हिडिओ पाहिल्या रात्री मला झोप येत नव्हती. मी स्क्रिप्टही वाचली होती. तेथून ते चित्रपट करेपर्यंत एकाही रात्री मला नीट झोप लागल्याचे आठवत नाही. कित्येकदा असे झाले की, मी स्वतःशीच बडबडू लागलो. मला वाटले की मी डिप्रेशनमध्ये जात आहे. लहानसहान गोष्टींवरून चिडचिड व्हायची. मी कोणालाही काहीही बोलत होतो.

भूमिकेतून बाहेर पडायला लागले दोन महिने
यावर मात करण्यासाठी मी मेडिटेसनची मदत घेतली. दोन आठवड्यांची सुट्टी घेऊन हिमाचल प्रदेशातील धर्मशाला येथे गेलो. हॉटेलमध्ये बरेच दिवस राहिलो. लोकांशी संवाद साधला जेणेकरून मी या गोष्टींमधून बाहेर पडू शकेन. मी दिवसातील तासन् तास मेडिटेशन केले. मी काही चांगले आणि वेगळे विषय पाहण्याचा प्रयत्न करायचो, ज्यामध्ये मी स्वतःला दुस-या ठिकाणी गुंतवू शकलो.

क्लायमॅक्स सीन एका टेकमध्ये ओके झाला
जेव्हा मला पहिल्यांदा स्क्रिप्ट वाचायला मिळाली, तेव्हा मी खूप उत्सुक होतो आणि त्या सीनबद्दल नर्व्हस होतो. दिग्दर्शक विवेक रंजन अग्निहोत्री यांनी सांगितले होते की, ते पॅचमध्ये सीन शूट करतील, कारण तो एकच सीन 13 पानांचा होता आणि एकाच वेळी 13 पानांचा मोनोलॉग बोलणे शक्य होणार नाही. तो क्लायमॅक्स सीन होता. मी विवेक सरांना सांगितले की, मी तो सीन वन टेकमध्ये करण्याचा प्रयत्न करेन. मी प्रत्येक गोष्टीवर संशोधन केले, कारण मला वाटले की जोपर्यंत मी आत्मविश्वास बाळगत नाही तोपर्यंत मी प्रेक्षकांपर्यंत पोहोचू शकणार नाही.

पात्राचा प्रत्येक क्षण जगलो
माझे पात्र कृष्णा पंडित हा अतिशय गोंधळलेला मुलगा आहे, त्याच्यासमोर वेगवेगळी-वेगळी कथा मांडली जाते. ही भूमिका वठवताना मी त्या पात्राचा प्रत्येक क्षण जगलो आहे.

लोक चार्टर्ड विमानाने चित्रपट पाहण्यासाठी येत आहेत
लोकांच्या प्रतिक्रिया मी शब्दांत व्यक्त करू शकत नाही. लोकांच्या मनाला चित्रपट एवढा स्पर्श करुन गेलाय, हे चित्र कदाचित पहिल्यांदाच दिसत असावे. लोक या चित्रपटाकडे अतिशय भावनिक होऊन बघत आहेत. हा चित्रपट पाहिल्यानंतर लोक त्याचे प्रमोशन आणि समर्थनही करत आहेत. सर्वात आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे UAE हून दोन-तीन चार्टर्ड विमाने, ज्यात अडीचशे आणि चारशे लोक सकाळी आले आणि चित्रपट पाहून संध्याकाळी परत गेले.

हा चित्रपट लोकांच्या मनाला नक्कीच स्पर्श करेल याची खात्री होती
जेव्हा मी स्क्रिप्ट वाचली तेव्हा मला वाटले की हा एक मोठा प्रामाणिक चित्रपट आहे. लोकांच्या मनाला नक्कीच स्पर्श करेल. लोक सत्य जाणून घेण्याचा प्रयत्न नक्कीच करतील, पण याला एवढा मोठा प्रतिसाद मिळेल, अशी अजिबात अपेक्षा नव्हती. लोक सत्य जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहेत, त्याचा प्रचार करत आहेत, हे माझ्या कल्पना शक्तीपलीकडील आहे.

या चित्रपटानंतर माझ्याबद्दलचा निर्मात्यांचा दृष्टिकोन बदलला आहे
जेव्हा मी ए-लिस्टर दिग्दर्शकाला भेटायचो तेव्हा ते मला एक नव्हे तर चार कथा सांगायचे. ते म्हणायचे की, तू मुख्य भूमिका साकारावी असे आम्हाला वाटते. पण त्यासाठी तू आधी काही तरी कर, म्हणजे निर्माते तुझ्यावर पैसा लावण्यास तयार होती. मी म्हणायचो की, हे तुम्हीच करु शकता. आता त्यांची माझ्याबद्दलची विचारसरणी बदलल्याचे दिसते. आता मला समोरून फोन येत आहेत. मी देवाचे आभार मानतो. मला ज्या प्रकारच्या भूमिका करायच्या आहेत, आता कदाचित त्या भूमिका मला मिळतील.

अनुपम खेर यांच्यासोबत शूटिंग करण्यापूर्वी नर्व्हस होतो
आम्ही सेटवर गेलो होतो. मी पहिल्यांदा माझे आजोबा बनलेल्या अनुपम खेर यांच्यासोबत शूटिंग करणार होतो आणि लोकेशन आमच्या घराचे होते. मी त्यांच्यासोबत काम करण्यास जेवढा उत्सुक होतो तेवढाच घाबरलेला देखील होतो. विवेक जी आले, आम्हाला वाटले की ते आम्हाला सीनबद्दल समजावून सांगतील. पण ते येताच म्हणाले की, तुम्ही लोक पहिल्यांदाच एकमेकांसोबत काम करत आहात. जर तुम्हाला तुमची केमिस्ट्री डेव्हलप करण्यासाठी आणि हे घर स्वतःचे वाटावे यासाठी थोडा वेळ घ्यायचा असेल तर तुम्ही तो घेऊ शकता.

त्यानंतर दीड-दोन तास आम्ही तिथे वेळ घालवला. ते दीड तास आमच्यासाठी खूप कमालीचे ठरले. अनुपम खेर यांच्यासोबतची माझी केमिस्ट्री छान जुळली. आता त्याच दृश्यांचे कौतुक होत आहे. हे एका चांगल्या दिग्दर्शकाचे वैशिष्ट्य आहे. सर्वप्रथम माझ्यावर विश्वास ठेवल्याबद्दल आणि मला या चित्रपटाचा भाग बनवल्याबद्दल विवेक जी आणि पल्लवी यांचे आभार.

सेटवरील प्रत्येकजण कथेला न्याय देण्याचा प्रयत्न करत होता
सेटवरचं वातावरण कुटुंबासारखं होतं. आमच्याकडे मेकअप रूम किंवा व्हॅनिटी व्हॅन होती, असे आमच्यापैकी कुणाला आठवतही नसेल. एका सत्यकथेवर काम करताना आमचा भर कथेला जास्तीत जास्त न्याय देण्यावर होता.

दिग्दर्शकाप्रमाणे तुम्हालाही धमक्या मिळाल्या का?
नाही, अद्याप माझ्या बाबतीत असे काही घडलेले नाही. मी एक अभिनेता आहे. माझ्यासमोर जे आणले होते ते मी साकारले. सत्य लोकांसमोर आणले पाहिजे, मांडले पाहिजे, असे मला वाटले.

बातम्या आणखी आहेत...