आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराफिल्ममेकर विवेक अग्निहोत्री यांचा 'द काश्मीर फाइल्स' हा चित्रपट काश्मिरी पंडितांवर आधारित आहे. 26 जानेवारी रोजी चित्रपटाचे पोस्टर अमेरिकेतील टाइम्स स्क्वेअर टॉवरवर प्रदर्शित करण्यात आले. यानंतर आता विवेक यांना चित्रपट प्रदर्शित न करण्याच्या धमक्या येत आहेत. या चित्रपटाचे प्रदर्शन थांबवा अन्यथा तुम्हाला ठार मारू असे त्यांना सांगण्यात येत आहे.
प्रदर्शन थांबवा अन्यथा जीव जाईल
ETimes च्या रिपोर्टनुसार, दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांचा काश्मीर फाइल्स हा चित्रपटाचे यूएसएमध्ये 30 पेक्षा जास्त वेळा स्क्रिनिंग झाले आहे. भारतात हा चित्रपट महिन्याभरानंतर म्हणजे 11 मार्च रोजी सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे. याबाबत विवेक यांना सतत धमकीचे फोन येत आहेत. भारतातील काश्मीर फाइल्सचे प्रदर्शन थांबवावे, अशी धमकी त्यांना देण्यात आली आहे. यूएसएमध्येही त्यांना स्क्रिनिंग थांबवण्याचे कॉल आले होते, पण त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले. पण आता भारतात रिलीजची तारीख जवळ येत असल्याने त्यांना येणा-या धमकीचे कॉल्स आणि मेसेजची संख्याही वाढत आहे. या मेसेज आणि कॉल्समधून जीवे मारण्याच्या धमक्याही दिल्या जात आहेत.
हा चित्रपट जातीय मुद्द्यांवर आधारित नाही
विवेक यांनी त्यांच्या एका जुन्या मुलाखतीत या चित्रपटाबद्दल सांगितले होते. त्यांनी सांगितल्यानुसार, या चित्रपटाकडून प्रेक्षक काहीही अपेक्षा करत नाही. कारण सत्याकडून काय अपेक्षा करणार. हा चित्रपट एक सत्य आहे, त्यातील प्रत्येक शब्द सत्य आहे आणि त्यातील प्रत्येक कथा सत्य आहे. काश्मीर फाइल्स जातीय मुद्द्यांवर आधारित आहे की समुदाय आणि कट्टरतावादावर चपराक आहे, असा विचार लोक करत असतील. पण 5 मिनिटे चित्रपट पाहिल्यानंतर सर्वांना समजेल की, असे काही नाही. विवेक अग्निहोत्री दिग्दर्शित 'द काश्मीर फाइल्स'मध्ये अनुपम खेर, मिथुन चक्रवर्ती, पल्लवी जोशी आणि दर्शन कुमार दिसणार आहेत. हा चित्रपट 11 मार्चला सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.