आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराफिल्ममेकर विवेक रंजन अग्निहोत्री यांना त्यांच्या आगामी 'द कश्मीर फाइल्स' या चित्रपटाचे भारतातील प्रदर्शन रोखण्यासाठी धमक्या येत आहे. त्यांना जीवे मारण्याच्या धमक्या येत आहेत. आता अलीकडेच विवेक अग्निहोत्री यांनी त्याचे ट्विटर अकाउंट डिएक्टिवेट केले आहे. यासोबतच त्यांनी सोशल मीडियावर एक खुले पत्र शेअर केले आहे. विवेक यांना सतत कॉल आणि मेसेजवर जीवे मारण्याच्या धमक्या येत आहेत.
विवेकने यांनी शेअर केले ओपन लेटर
विवेकने आपल्या पत्रात लिहिले, 'माझे ट्विटर अकाऊंट सस्पेंड केले गेले आहे की नाही याबद्दल बरेच लोक विचार करत आहेत. तर माझे अकाउंट सस्पेंड करण्यात आलेले नाही तर मी स्वतः ते डिएक्टिवेट केले आहे. जेव्हापासून मी कश्मीर फाइल्स मोहीम सुरू केली आहे, ट्विटर शॅडोने माझ्यावर बंदी घातली आहे. माझ्या फॉलोअर्समध्ये कमालीची घट झाली आहे आणि माझे बहुतेक फॉलोअर्स माझे कोणतेही ट्विट पाहू शकत नाहीत. त्याशिवाय, माझा इनबॉक्स अश्लील आणि धमकी देणाऱ्या मेसेजेसनी भरलेला होता. मी अशा घटकांना हाताळू शकत नाही, असे नाही. परंतु अनेक पाकिस्तानी आणि चिनी बॉट्स होते, असे मला वाटत होते.'
आपल्या पत्रात त्यांनी पुढे लिहिले, 'तुम्ही कितीही कणखर असलात तरी तुमच्या आजूबाजूला इतका द्वेष आणि तुमच्या कुटुंबाला धमक्या येणे ही मानसिक परीक्षा आहे. का? आपल्या काश्मिरी बंधू-भगिनींच्या वेदना आणि व्यथांवर प्रामाणिक चित्रपट बनवल्यामुळे? सत्य बाहेर येईल म्हणून ते नाराज आहेत का? सोशल मीडियाच्या कुरूप जगाने अनेक वाईट घटकांना बळ दिले आहे. यासह आमचे मौन त्यांना यशस्वी होण्याची आशा देते. माझा 'द कश्मीर फाइल्स' चित्रपटाने ते मौन तोडले आहे.'
विवेक यांनी पुढे लिहिले की, मी नेहमीच भारताच्या शत्रूंविरोधात बोललो आहे. शिव आणि सरस्वती या पवित्र भूमीचा नाश करणाऱ्या अमानुष दहशतवादाचा पर्दाफाश करण्याचा हा चित्रपट एक प्रयत्न आहे.... आणि आता धार्मिक दहशतवाद भारतात शिरकाव करत आहे. त्यामुळे माझ्यासारख्या लोकांना गप्प बसवायचे आहे. मला गप्प बसवता येणार नाही हे त्यांना कळायला हवे. मी माझ्या सर्व फॉलोअर्स आणि चाहत्यांचे प्रेम आणि समर्थनाबद्दल आभार मानतो.
हा चित्रपट 11 मार्चला रिलीज होणार आहे
विवेक अग्निहोत्री दिग्दर्शित 'द कश्मीर फाइल्स'मध्ये अनुपम खेर, मिथुन चक्रवर्ती, पल्लवी जोशी आणि दर्शन कुमार दिसणार आहेत. हा चित्रपट 11 मार्चला सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.