आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'द कश्मीर फाइल्स' ऑल टाइम ब्लॉकबस्टर:दहाव्या दिवशी चित्रपटाने केली तब्बल 26.20 कोटींची कमाई, आतापर्यंत जमवला 167.45 कोटींचा गल्ला; दररोज कमाईमध्ये 20% पर्यंत होतेय वाढ

2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • 'द कश्मीर फाइल्स'चे कलेक्शन चकित करणारे आहे.

'द कश्मीर फाइल्स' या चित्रपटाने प्रदर्शनाच्या दहाव्या दिवशी भारतीय बॉक्स ऑफिसवर तब्बल 26.20 कोटींचा गल्ला जमवला आहे. तर नवव्या दिवशी या चित्रपटाने 24.80 कोटींचा व्यवसाय केला आहे. 11 मार्च रोजी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर आतापर्यंत 167.45 कोटींची कमाई केली आहे. ट्रेड पंडित तरण आदर्श यांच्या मते, हा चित्रपट येत्या बुधवार-गुरुवारपर्यंत 200 कोटींची कमाई करु शकतो. याचे कारण म्हणजे चित्रपटाचे अ‍ॅडव्हान्स बुकिंगला चांगला प्रतिसाद मिळतोय.

18 मार्च रोजी प्रदर्शित झालेला अक्षय कुमारचा 'बच्चन पांडे' हा चित्रपट देखील 'द कश्मीर फाइल्स'ची क्रेझ कमी करु शकलेला नाही. याउलट बच्चन पांडेला या चित्रपटाची तगडी फाइट मिळाली आहे. बच्चन पांडे हा चित्रपट मोठी स्टारकास्ट असून देखील दुस-या दिवशी केवळ 12 कोटींचा व्यवसाय करू शकला आहे.

'द कश्मीर फाइल्स'ने 9व्या दिवशी 24.80 आणि 10 व्या दिवशी केली 26.20 कोटींची कमाई
चित्रपट व्यापार विश्लेषक तरण आदर्श यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत हा चित्रपट येत्या बुधवार-गुरुवारपर्यंत 200 कोटींची कमाई करु शकतो, असे म्हटले आहे. या चित्रपटाने दहाव्या दिवशी म्हणजे रविवारी तब्बल 26.20 कोटींची कमाई केली आहे. तर 9व्या दिवशी चित्रपटाने भारतात 24.80 कोटी रुपयांचे बॉक्स ऑफिस कलेक्शन केले आहे. याआधी या चित्रपटाने भारतात 8व्या दिवशी 19.15 कोटी, सातव्या दिवशी 18.05 कोटी, सहाव्या दिवशी 19.05 कोटी, पाचव्या दिवशी 18 कोटी, चौथ्या दिवशी 15.05 कोटी, तिसऱ्या दिवशी 15.10 कोटी, दुस-या दिवशी 8.50 कोटी आणि पहिल्या दिवशी 3.55 कोटींची कमाई केली होती.

स्टार पॉवरने सुसज्ज 'बच्चन पांडे'ही मागे पडला
अक्षय कुमारचा 'बच्चन पांडे' हा चित्रपट फुल टू एंटरटेनर चित्रपट आहे. यात अक्षय व्यतिरिक्त जॅकलिन फर्नांडिस, क्रिती सेनन, अर्शद वारसी आणि पंकज त्रिपाठी ही तगडी स्टारकास्ट आहे. असे असूनही हा चित्रपट दुसऱ्या दिवशी केवळ 12 कोटींचा व्यवसाय करू शकला आहे.

बिझनेस अ‍ॅनालिस्ट तरण आदर्श यांनी 'बच्चन पांडे' या चित्रपटाच्या व्यवसायाचा दुसऱ्या दिवसाचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे.
बिझनेस अ‍ॅनालिस्ट तरण आदर्श यांनी 'बच्चन पांडे' या चित्रपटाच्या व्यवसायाचा दुसऱ्या दिवसाचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे.
  • व्यवसायात सातत्याने दिसतेय 10 ते 20% ची वाढ

'द कश्मीर फाइल्स' चित्रपट सुमारे 12 कोटींच्या खर्चात तयार झालेला चित्रपट आहे. विशेष म्हणजे यात एकही मोठा कमर्शिअल स्टार नाहीये. तरीदेखील याच्या व्यवसायात सातत्याने 10 ते 20 टक्क्यांची वाढ दिसून येतेय. कदाचित असे पहिल्याच बॉलिवूड चित्रपटाच्या बाबतीत घडत असावे. इतकेच नाही तर पहिल्या दिवशी या चित्रपटाला देशभरात केवळ 600 स्क्रीन्स मिळाल्या. नंतर, प्रेक्षकांचा वाढता प्रतिसाद बघता पहिल्याच आठवड्यात स्क्रीन काउंट 600 वरून 2,000 पर्यंत वाढवण्यात आला. तर दुसऱ्या आठवड्याच्या सुरुवातीपासूनच हा चित्रपट तब्बल 4,000 हून स्क्रीनवर दाखवला जातोय.

चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान काढलेला हा फोटो आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शक विवेक रंजन अग्निहोत्री आणि अनुपम खेर सीनबद्दल चर्चा करताना यात दिसत आहेत.
चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान काढलेला हा फोटो आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शक विवेक रंजन अग्निहोत्री आणि अनुपम खेर सीनबद्दल चर्चा करताना यात दिसत आहेत.
बातम्या आणखी आहेत...