आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बॉक्स ऑफिस कलेक्शन:'द केरला स्टोरी'ची यशस्वी घौडदौड सुरू, कमाईत तिसऱ्या दिवशी मोठी वाढ; जमवला ‘एवढ्या' कोटींचा गल्ला

22 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

विपुल शहांची निर्मिती असलेले आणि सुदीप्तो सेन दिग्दर्शित ‘द केरला स्टोरी’ हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर कोटीच्या कोटी उड्डाणे घेत आहे. प्रदर्शित होण्याआधीपासून वादात सापडलेल्या या चित्रपटाला माऊथ पब्लिसिटीचा चांगलाच फायदा होताना दिसतोय. चित्रपट बॉक्स ऑफिसवर प्रदर्शित झाल्यापासून चांगली कमाई करत आहे. वीकेंडला चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला असून तीन दिवसांत चित्रपटाने चांगला गल्ला जमवला आहे.

'द केरला स्टोरी'च्या बॉक्स ऑफिस कलेक्शनमध्ये दोन दिवसांच्या तुलनेत तिसऱ्या दिवशी चांगलीच वाढ झाल्याचे पाहायला मिळालं. रविवारी या चित्रपटाने तब्बल 16.50 कोटींची कमाई केल्याची माहिती समोर आली आहे. चित्रपटाने पहिल्या दिवशी 8.3 कोटी आणि दुसऱ्या दिवशी जवळपास 12 कोटींचा गल्ला जमवला होता. अशाप्रकारे चित्रपटाने अवघ्या तीन दिवसांत बॉक्स ऑफिसवर 35.75 कोटींची कमाई केली आहे.

2023 चा पाचवा सर्वात मोठा ओपनर ठरला
यावर्षी प्रदर्शित झालेल्या हिंदी चित्रपटांचे कलेक्शन साधारण राहिले आहे. पाच महिन्यात केवळ पाच हिंदी चित्रपटांनी पहिल्या दिवशी चांगली ओपनिंग मिळवली आहे. शाहरुख खानच्या 'पठाण'ने 55 कोटी रुपयांसह इतिहासातील सर्वात मोठी ओपनिंग मिळवली. तर सलमान खानचा 'किसी का भाई किसी की जान' हा चित्रपट 15.81 कोटींच्या कमाईसह दुसऱ्या क्रमांकावर आहे. रणबीर कपूर स्टारर 'तू झुठी मैं मक्कार' हा चित्रपट 15.73 कोटी कमाईसह वर्षातील तिसरा सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला आहे. अजय देवगणचा 'भोला' 11.20 कोटी रुपयांसह चौथ्या क्रमांकावर आहे. आता 'द केरला स्टोरी' देखील 7.5 कोटींसह या यादीत पाचव्या क्रमांकावर आला आहे.

तामिळनाडूमधील चित्रपटगृहांमध्ये सिनेमाच्या प्रदर्शनावर बंदी घालण्यात आली आहे. तामिळनाडू मल्टिप्लेक्स असोसिएशनने चित्रपट प्रदर्शित न करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतरही चित्रपटाने तिसऱ्या दिवशी चांगले प्रदर्शन केले. 'द केरला स्टोरी' या चित्रपटाचे कथानक नर्सिंग महाविद्यालयात शिकणाऱ्या शालिनी उन्नीकृष्णनवर आधारित आहे. केरळमधील मुलींचे धर्म परिवर्तन करुन त्यांना दहशतवादी संघटना ISIS मध्ये कसे सामील केले जाते हे सांगणारा 'द केरला स्टोरी' हा चित्रपट आहे.