आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करा'द केरला स्टोरी' हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर यशस्वी वाटचाल करत आहे. कर्नाटक आणि बंगाल सारख्या राज्यांमध्ये बंदी असतानाही चित्रपटाने आतापर्यंत सुमारे 67.42 कोटींची कमाई केल्याचे सांगितले जात आहे. तर अवघ्या पाच दिवसांतच चित्रपटाने 50 कोटींचा आकडा ओलांडला. दरम्यान मंगळवारी चित्रपटाची मुख्य अभिनेत्री अदा शर्माने चित्रपटाला दिलेल्या प्रेमाबद्दल प्रेक्षकांचे आभार मानले आहेत. चित्रपटाचा अनुभव सांगताना अदा म्हणाली की, शालिनी उन्नीकृष्णनच्या व्यक्तिरेखेने तिला शारीरिक आणि मानसिकरित्या हादरवून सोडले, तसेच या व्यक्तिरेखेचा तिच्या मनावर खूप खोलवर परिणाम झाला आहे.
केरळच्या कथेने मला भावनिक आणि शारीरिकदृष्ट्या हादरवून सोडले आहे
ईटाइम्सला दिलेल्या मुलाखतीत अदाला विचारण्यात आले - 'या पात्राने तुला किती प्रभावित केले?' यावर ती म्हणाली, 'या व्यक्तिरेखेने माझ्यावर शारीरिक आणि भावनिक प्रभाव टाकला आहे. त्यांच्या जखमा माझ्या हृदयापर्यंत पोहोचल्या आहेत, त्या कधीही पुसल्या जाणार नाहीत.'
फिल्मी पार्श्वभूमी नसूनही प्रेम मिळाले, खरंच हे अपेक्षित नव्हते
चित्रपटाच्या यशाबद्दल बोलताना अदा म्हणाली- 'फिल्मी पार्श्वभूमी नसतानाही मला जे प्रेम मिळाले ते अपेक्षित नव्हते. आज संपूर्ण देश मला प्रोत्साहन देत आहे. मी खूप आभारी आहे. माझा हा आनंद मी शब्दांत व्यक्त करू शकत नाही.'
चित्रपटाचा संदेश कदाचित अनेक मुलींचे प्राण वाचवू शकेल
चित्रपटात दिलेल्या संदेशाविषयी बोलताना अदा म्हणाली- 'आम्ही चित्रपटातून जो संदेश देण्याचा प्रयत्न केला आहे, त्यामुळे कदाचित अनेक मुलींचे प्राण वाचतील. प्रेक्षकांकडून आम्हाला मिळालेले प्रेम खरोखरच खूप मोठी गोष्ट आहे.'
दहशतवादाचा मुद्दा खरोखरच गंभीर आहे
'हा चित्रपट एक संवेदनशील मुद्दा मांडतो, यात इस्लामिक धर्मांतराची कहाणी आहे. अशा परिस्थितीत तुला हा चित्रपट करताना भीती वाटली का?' असा प्रश्न अदाला विचारण्यात आला. याचे उत्तर देताना अभिनेत्री म्हणाली, 'पहिल्या दिवशी स्क्रिप्ट वाचण्यापासून ते चित्रपटाच्या शूटिंगपर्यंत, द केरला स्टोरीची कथा अशा एका मुलीची होती जिला ISIS मध्ये ढकलले गेले. दरम्यान तिला दहशतवादाचे भयंकर रूप पाहायला मिळते. दहशतवाद हा खरोखरच एक गंभीर मुद्दा आहे, पण ही कथा कोणीतरी दाखवायला हवी होती.'
कोणताही निर्णय घेण्यापूर्वी दोनदा विचार करा
अशा प्रकारच्या जाळ्यात अडकलेल्या मुलींबद्दल बोलताना अदा म्हणाली- 'आयुष्यात कोणतीही परिस्थिती असो. लहान अथवा मोठा निर्णय असो, एक मुलगी असल्याने तुम्ही दोनदा विचार केला पाहिजे. तुम्ही तुमच्या कुटुंबाचा सल्ला घ्यायला हवा.'
या कथेतून दबलेल्या कथांना आवाज मिळाला
यशाबद्दल आनंद व्यक्त करताना अदा म्हणाली- 'द केरला स्टोरीमुळे अनेक महिलांचे आयुष्य बदलून जाईल, हे कळल्यानंतर मला आनंद होतोय. अनेक न ऐकलेल्या कथांना या चित्रपटातून आवाज मिळाला आहे. हेच माझ्यासाठी खरे सेलिब्रेशन आहे.'
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.