आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बॉक्स ऑफिसवर यशस्वी घोडदौड:अनेक राज्यात बंदी, तरीही 'द केरला स्टोरी'ने अवघ्या पाच दिवसांत जमावला 50 कोटींचा गल्ला

20 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

‘द केरला स्टोरी’ हा चित्रपट प्रदर्शनाआधीपासूनच वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. रिलीजनंतरही या चित्रपटावर मतमतांतरे पाहायला मिळत आहेत. तामिळनाडू, प. बंगाल या राज्यात चित्रपटावर बंदी घालण्यात आली आहे, तर हा चित्रपट जास्तीत जास्त लोकांनी पाहावा यासाठी तो अनेक ठिकाणी करमुक्त करण्यात आला आहे. मध्य प्रदेश, उत्तर प्रदेशात हा चित्रपट करमुक्त करण्यात आला आहे. अनेक वादानंतरही हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर मात्र यशस्वी वाटचाल करताना दिसत आहे. या चित्रपटाचे बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर आले आहे.

मंडे टेस्टमध्ये पास झाला चित्रपट
ट्रेड विश्लेषक तरण आदर्श यांनी सोमवारपर्यंतचे चित्रपटाचे कलेक्शन शेअर करत लिहिले, 'द केरला स्टोरी हा चित्रपट मंडे टेस्टमध्ये डिस्टिंक्शन मार्कांनी पास केला आहे. वर्किंग डे असूनही चित्रपटाने तब्बल 10.07 कोटींची कमाई केली,' असे त्यांनी सांगितले.

चित्रपटाच्या कलेक्शनचे मंगळवारचे आकडेही आलेत समोर
चित्रपटाच्या कलेक्शनचे आता मंगळवारचे आकडेही समोर आले आहेत. मंगळवारी या चित्रपटाने 11 कोटींची कमाई केली आहे. वर्किंग डे असूनही चित्रपटाच्या कमाईत घट ऐवजी वाढच पाहायला मिळत आहे.

'द केरला स्टोरी'ची आतापर्यंतची कमाई

  • पहिला दिवस (5 मे) 8.3 कोटी
  • दुसरा दिवस (6 मे) 12 कोटी
  • तिसरा दिवस (7 मे) 16.50 कोटी
  • चौथा दिवस (8 मे) 10.50 कोटी
  • पाचवा दिवस (9 मे) 11 कोटी
  • एकुण कलेक्शन -- 56.72 कोटी

सुदीप्तो सेन दिग्दर्शित या चित्रपटात अदा शर्मा, योगिता बिहानी, सिद्धी इदनानी आणि सोनिया बालानी या अभिनेत्री मुख्य भूमिकेत आहेत. केरळमधील दहशतवादी कटांवर आधारित हा चित्रपट आहे. सध्या या चित्रपटाची सर्वत्र चर्चा पाहायला मिळत आहे.

करमुक्त असल्याने चित्रपटाच्या कमाईत होणार वाढ
'द केरला स्टोरी' हा चित्रपट उत्तर प्रदेशमध्ये करमुक्त करण्यात येणार आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी मंगळवारी सकाळी ट्वीट करून याची माहिती दिली. त्यांनी लिहिले- 'द केरला स्टोरी' उत्तर प्रदेशमध्ये करमुक्त केला जाईल. 12 मे रोजी मुख्यमंत्री त्यांच्या मंत्रिमंडळासोबत चित्रपट पाहणार आहेत. याआधी मध्य प्रदेशात हा चित्रपट करमुक्त करण्यात आला आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत हा चित्रपट अजून चांगली कमाई करेल, असा अंदाज वर्तवला जात आहे.