आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

योगी सरकारचा निर्णय:UP मध्ये 'द केरला स्टोरी' चित्रपट टॅक्स फ्री, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ मंत्रिमंडळासह पाहणार चित्रपट

21 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

'द केरला स्टोरी' या चित्रपटावरुन आता राजकारण तापू लागले आहे. एकीकडे काही राज्यांमध्ये या चित्रपटावर बंदी घातली जात आहे, तर दुसरीकडे काही ठिकाणी या चित्रपटाला करमुक्त करण्याची मागणी केली जात आहे. दरम्यान, आता उत्तर प्रदेशमध्येही हा चित्रपट करमुक्त करण्यात आला आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी स्वतः ट्विट करून चित्रपट करमुक्त केल्याची घोषणा केली आहे. मुख्यमंत्री त्यांच्या संपूर्ण मंत्रिमंडळासह मंगळवारी (9 मे) विशेष स्क्रीनिंगमध्ये हा चित्रपट पाहू शकतात, असे सांगितले जात आहे. यापूर्वी मध्य प्रदेशात हा चित्रपट करमुक्त करण्यात आला होता. तर मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी पश्चिम बंगालमध्ये या चित्रपटावर बंदी घातली आहे. तमिळनाडूमध्येही चित्रपट प्रदर्शित न करण्याचा निर्णय सिनेमागृहांनी घेतला आहे.

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी ट्वीट करून 'द केरला स्टोरी'ला राज्यात करमुक्त केले जाईल, असे सांगितले आहे.

उत्तर प्रदेशातील देवरियाचे आमदार शलभ मणि त्रिपाठी यांनीही ट्विट करून चित्रपट करमुक्त झाल्याची माहिती दिली आहे. उपमुख्यमंत्री ब्रजेश पाठक यांनीही याबाबत कोणताही प्रस्ताव आल्यास राज्य सरकार चित्रपट करमुक्त करेल, असे सांगितले होते.

ट्रेलर लाँच झाल्यापासून हा चित्रपट वादात सापडला होता. असे असूनही हा चित्रपट अनेक राज्यांनी करमुक्त केला आहे. मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी शनिवारी (6 मे) ‘द केरला स्टोरी’ हा चित्रपट राज्यात करमुक्त करण्याची घोषणा केली होती.

या राज्यांमध्ये चित्रपट करमुक्त करण्याची मागणी
महाराष्ट्र आणि दिल्लीतही चित्रपट करमुक्त करण्याची मागणी केली जात आहे. 'द केरला स्टोरी'मधून लव्ह जिहादची संपूर्ण प्रक्रिया लोकांसमोर आली आहे, असे नाशिकमधील हिंदू सकल समाजाने म्हटले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे चित्रपट करमुक्त करतील अशी शक्यता वर्तवली जातेय.

राज्यात चित्रपट करमुक्त करण्याचा अर्थ काय?
जीएसटी लागू होण्यापूर्वी हिंदी चित्रपटांवर 40 टक्के करमणूक कर आकारला जात असे. जीएसटी लागू झाल्यानंतर हे चित्र बदलले. आता जीएसटी हा एकच कर असल्याने तो सर्व भाषेतील चित्रपटांना सम प्रमाणात लागू झाला आहे. परिणामी, सर्व भाषेतील चित्रपटांच्या किंमती सारख्या झाल्या आहेत. शंभर रुपयांपर्यंतच्या तिकिटांना 12 टक्के आणि त्यापुढील तिकिटांना 18 टक्के जीएसटी लागू झाला आहे. या कराची दोन भागात विभागणी केली जाते. एक हिस्सा राज्य सरकार आणि दुसरा म्हणजे केंद्र सरकर. एखाद्या राज्यात चित्रपट करमुक्त करणे म्हणजे चित्रपट टॅक्स फ्री होतो तेव्हा केवळ त्यांचा म्हणजे स्टेट GST माफ केला जातो.

धमकी:'द केरला स्टोरी' चित्रपटाच्या क्रू मेंबरला धमकी, अज्ञात व्यक्तीने पाठवला मेसेज - घराबाहेर पडू नको; पोलिसांनी वाढवली सुरक्षा

द केरल स्टोरी या चित्रपटाशी संबंधित वाद दिवसागणिक वाढत आहे. अनेक राज्यांत या चित्रपटावर बंदी घालण्याची मागणी होत असताना, या फिल्मच्या एका क्रू मेंबरला एका अनोळखी नंबरवरून धमकी देण्यात आली आहे. या मेसेजमध्ये नमूद करण्यात आले आहे की, 'घराबाहेर पडू नको. ही कथा चित्रपटाद्वारे मांडून तुम्ही चांगले केले नाही.' येथे वाचा सविस्तर वृत्त...

'द केरल स्टोरी' चित्रपटाची खरी कहाणी:हजारो हिंदू मुलींना इस्लाम धर्म स्वीकारून सीरियात पाठवल्याची चर्चा कशी सुरू झाली?

'द केरल स्टोरी' हा चित्रपट त्याची कथा आणि दाव्यांमुळे चर्चेत आहे. त्याचा ट्रेलर 26 एप्रिल रोजी रिलीज झाला होता. हा चित्रपट 4 मुलींच्या जीवनावर आधारित आहे. 2 मिनिट 45 सेकंदाच्या ट्रेलरमध्ये 4 महाविद्यालयीन मुली दहशतवादी संघटनेत कशा प्रकारे सामील होतात हे दाखवण्यात आले आहे.

ट्रेलरची सुरुवात शालिनी उन्नीकृष्णन या केरळमधील हिंदू मुलीच्या परिचयाने होते, ज्यामध्ये ती दहशतवादी संघटना ISIS मध्ये सामील होण्याची संपूर्ण कहाणी सांगत आहे. ट्रेलरमध्ये दाखवण्यात आले आहे की एक टोळी केरळमधील मुलींचे ब्रेनवॉश करून त्यांचे धर्मांतर करून त्यांना ISIS या दहशतवादी संघटनेचा भाग बनवते. यासाठी कधी शारीरिक संबंध, तर कधी धार्मिक श्रद्धा हे साधन म्हणून वापरले जातात.

हा ट्रेलरचा विषय झाला. 'द केरल स्टोरी' चित्रपटात केलेले आरोप सिद्ध करणाऱ्याला एका मुस्लिम संघटनेने एक कोटी रुपयांचे बक्षीस जाहीर केले आहे. 5 मे रोजी प्रदर्शित होणाऱ्या या चित्रपटावर केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयनपासून ते शशी थरूरपर्यंत अनेकांनी प्रश्न उपस्थित केले आहेत. येथे वाचा संपूर्ण बातमी...