आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करा'द केरला स्टोरी' या चित्रपटावर बंदी घालण्याची मागणी सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली आहे. केरळच्या डाव्या लोकशाही आघाडीने आणि काँग्रेसने चित्रपटावर हेटस्पीचला चालना देणे आणि ऑडिओ-व्हिज्युअल प्रपोगंडा असल्याचा आरोप केला होता. याप्रकरणी दाखल करण्यात आलेल्या हस्तक्षेप याचिकेवर तातडीने सुनावणी देण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला आहे.
हा चित्रपट हेटस्पीचचा सर्वात खालचा स्तर आहे : निझाम पाशा
मंगळवारी, न्यायमूर्ती केएस जोसेफ आणि बीव्ही नागरत्ना यांच्या खंडपीठाकडून अधिवक्ता निझाम पाशा आणि ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी या प्रकरणात तातडीने सुनावणी घेण्याची मागणी केली.
त्यांनी खंडपीठाला सांगितले की, हा चित्रपट शुक्रवारी प्रदर्शित होणार आहे आणि चित्रपटाच्या ट्रेलरला आतापर्यंत 16 मिलियन व्ह्यूज मिळाले आहेत. निझाम पाशा कोर्टात म्हणाले - हा चित्रपट हेट स्पीचचे सर्वात वाईट आणि सर्वात खालच्या दर्जाचे उदाहरण आहे. हा चित्रपट केवळ ऑडिओ-व्हिज्युअल प्रपोगंडा आहे.
हे हेटस्पीचचे प्रकरण नाही: SC
यावर उत्तर देताना न्यायमूर्तींच्या खंडपीठाने म्हटले की, हेटस्पीचचे अनेक प्रकार आहेत. असे नाही की कोणीतरी अचानक व्यासपीठावर जाऊन रँडमली हेटस्पीच पसरवत आहे. चित्रपटाला प्रमाणपत्र मिळाले असून सेन्सॉर बोर्डाने चित्रपटाच्या प्रदर्शनाला परवानगी दिली आहे.
आम्ही या चित्रपटावर कोणताही टॅग लावू शकत नाही. चित्रपट प्रदर्शित करण्याच्या निर्णयाला आव्हान द्यायचे असेल तर योग्य व्यासपीठ आणि फोरूमधून प्रयत्न करावेत.
सेन्सॉर बोर्डाने चित्रपटातील 10 दृश्ये कापली
त्याचवेळी न्यायमूर्ती नागरत्ना म्हणाल्या की, याप्रकरणी तुम्ही आधी उच्च न्यायालयात जायला हवे होते. याला उत्तर देताना पाशा म्हणाले की, चित्रपटाच्या प्रदर्शनासाठी अवघे काही दिवस उरले आहेत, त्यामुळे त्यांनी याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात हस्तक्षेप याचिका दाखल केली होती.
त्यावर खंडपीठाने म्हटले की, न्यायालय हे मोकळे मैदान नाही जेथे कोणीही कधीही येऊ शकते.
सेंट्रल बोर्ड ऑफ फिल्म सर्टिफिकेशनने या चित्रपटाला ए प्रमाणपत्र दिले असून चित्रपटातील जवळपास काही दृश्ये कापण्यात आली आहेत. केरळचे माजी मुख्यमंत्री व्हीएस अच्युतानंदन यांच्या मुलाखतीचा सीनही कापण्यात आला आहे.
'द केरला स्टोरी' चित्रपटाची खरी कहाणी: हजारो हिंदू मुलींना इस्लाम धर्म स्वीकारून सीरियात पाठवल्याची चर्चा कुठून आली?
ट्रेलरची सुरुवात शालिनी उन्नीकृष्णन या केरळमधील हिंदू मुलीच्या परिचयाने होते, ज्यामध्ये ती दहशतवादी संघटना ISIS मध्ये सामील होण्याची संपूर्ण कहाणी सांगत आहे. आता चित्रपटात केलेले दावे खरे की खोटे हा प्रश्न आहे. 'द केरला स्टोरी' या चित्रपटाची खरी वाचा दिव्य मराठी एक्सप्लेनरमध्ये… (संपूर्ण बातमी वाचा)
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.