आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

द केरला स्टोरीच्या रिलीजवर ब्रिटनमध्ये बंदी:शेवटच्या क्षणी शो रद्द; तिकिटाचे पैसे प्रेक्षकांना परत

लंडन17 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

द केरला स्टोरीचा वाद आता इंग्लंडपर्यंत पोहोचला आहे. हा चित्रपट तिथे 12 मे रोजी प्रदर्शित होणार होता. लोकांनी तिकिटेही खरेदी केली होती, मात्र शेवटच्या क्षणी चित्रपटाचे प्रदर्शन थांबवण्यात आले. तेथील काही भारतीयांनी सांगितले की, त्यांना रिफंड मेल आला आहे.

त्या मेलमध्ये असे लिहिले आहे की, ब्रिटिश सेन्सॉर बोर्डाने चित्रपटाला प्रमाणपत्र दिले नाही, त्यामुळे चित्रपटाचे प्रदर्शन पुढे ढकलण्यात आले आहे. सर्व वेबसाइटवरून तिकीट विक्रीवरही बंदी घालण्यात आली आहे. तिथे हा चित्रपट 31 स्क्रीन्सवर रिलीज होणार होता.

BBFC चित्रपटाला वयाचे प्रमाणपत्र देऊ शकले नाही

टाईम्स ऑफ इंडियाशी बोलताना सलोनी नावाच्या महिलेने सांगितले की, 'बर्‍याच लोकांनी चित्रपट पाहण्यासाठी तिकिटे काढली होती. स्क्रीनिंग देखील 95% भरले होते, परंतु शेवटच्या क्षणी एक मेल आला.

त्या मेलमध्ये लिहिले होते - ब्रिटिश बोर्ड ऑफ फिल्म क्लासिफिकेशन म्हणजेच BBFC या चित्रपटाला वयाचे प्रमाणपत्र देऊ शकत नाही. त्यामुळे आम्हाला तुमचे बुकिंग रद्द करावे लागेल. तुम्हाला झालेल्या गैरसोयीबद्दल आम्ही दिलगीर आहोत. आम्ही तुमचा परतावा पाठवत आहोत. सलोनीने सांगितले की, तिने चित्रपट पाहण्यासाठी 3 तिकिटे घेतली होती.

ब्रिटिश सेन्सॉर बोर्डाने सांगितले - चित्रपटाचे सर्टिफिकेशन अद्याप झाले नाही

बीबीएफसीच्या वतीने सांगण्यात आले की, 'द केरला स्टोरी या चित्रपटाचे प्रमाणपत्र अद्याप प्रक्रियेत आहे. वय मानांकन प्रमाणपत्र मिळताच हा चित्रपट यूकेच्या चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित केला जाईल.

यूकेमधील चित्रपटाचे वितरक सुरेश वारसानी यांनी नाराजी व्यक्त केली आणि ते म्हणाले की, चित्रपट प्रदर्शित करू नये म्हणून त्यांना सर्व थिएटर मालकांना कॉल करण्यास भाग पाडले गेले. यूकेमध्ये सेन्सॉर बोर्डाच्या परवानगीशिवाय चित्रपट दाखवणे बेकायदेशीर आहे.

सेन्सॉर बोर्डाच्या प्रमाणपत्राशिवाय इंग्लंडमध्ये कोणताही चित्रपट प्रदर्शित होऊ शकत नाही.
सेन्सॉर बोर्डाच्या प्रमाणपत्राशिवाय इंग्लंडमध्ये कोणताही चित्रपट प्रदर्शित होऊ शकत नाही.

वितरक म्हणाले - सेन्सॉर बोर्ड सरळ उत्तर देत नाहीये

सुरेश वरसानी म्हणाले, 'मी 10 मे रोजी चित्रपटाशी संबंधित सर्व काही सेन्सॉर बोर्डाकडे सादर केले. मी चित्रपटाच्या तिन्ही आवृत्त्या (हिंदी, तमिळ आणि मल्याळम) सेन्सॉर बोर्डाला सादर केल्या होत्या.

त्यांनी 10 मे रोजी एक आवृत्ती पाहिली, तर इतर दोन आवृत्ती दुसऱ्या दिवशी पाहिल्या. त्यानुसार वयाचा दाखला त्याच दिवशी होणार होता. आम्ही त्यांना विचारले असता त्यांच्याकडे सरळ उत्तर नव्हते.

सेन्सॉर बोर्डाच्या या निर्णयावर वितरकांनी नाराजी व्यक्त केली आहे.
सेन्सॉर बोर्डाच्या या निर्णयावर वितरकांनी नाराजी व्यक्त केली आहे.

वितरकांचे 40 ते 50 लाख रुपयांचे नुकसान

सुरेश सांगतात की, ते या व्यवसायात अनेक वर्षांपासून आहे, पण अशा परिस्थितीचा ते पहिल्यांदाच सामना करत आहेत. सर्टिफिकेट देण्यासाठी सेन्सॉर बोर्ड तीन दिवसांपेक्षा जास्त का घेत आहे, असा सवाल सुरेश यांनी केला. अगदी अमेरिका, ऑस्ट्रेलिया, कॅनडा आणि आयर्लंडनेही या चित्रपटाला ग्रीन सिग्नल दिला आहे. यामुळे त्यांचे आतापर्यंत 40 ते 50 लाख रुपयांचे नुकसान झाल्याचे सुरेश यांनी सांगितले.

टाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, यूकेमधील काही हिंदू आणि जैन संघटनांनी बीबीएफसीला पत्र लिहून या प्रकरणावर लवकरात लवकर तोडगा काढून चित्रपट प्रदर्शित करण्याची विनंती केली आहे.

केरला स्टोरी 5 मे रोजी भारतात प्रदर्शित झाली. हा चित्रपट 12 मे रोजी इंग्लंडमध्ये रिलीज होणार होता.
केरला स्टोरी 5 मे रोजी भारतात प्रदर्शित झाली. हा चित्रपट 12 मे रोजी इंग्लंडमध्ये रिलीज होणार होता.

केरला स्टोरीने भारतात 100 कोटींचा टप्पा ओलांडला आहे. चित्रपटाने नवव्या दिवशी म्हणजेच शनिवारी 19.50 कोटी रुपयांची कमाई केली आहे. अशा प्रकारे चित्रपटाची एकूण कमाई 112.99 कोटींवर गेली आहे. सुमारे 30 ते 35 कोटींमध्ये बनलेल्या या चित्रपटाने चांगली कमाई केली आहे. (वाचा पूर्ण बातमी)

भारतातही वाद, पश्चिम बंगालमध्ये बंदी, तामिळनाडूतील थिएटरचालक चालवायला तयार नाही

द केरला स्टोरी या चित्रपटावर पश्चिम बंगालमध्ये बंदी घालण्यात आली असून तामिळनाडूतील थिएटर ऑपरेटर्सनी तो प्रदर्शित न करण्याचा निर्णय घेतला आहे. निर्मात्यांच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने पश्चिम बंगाल आणि तामिळनाडू सरकारला नोटीस बजावली आहे. शुक्रवारी न्यायालयाने विचारले की, चित्रपट देशभरात सुरू असताना दोन्ही राज्यात काय अडचण आहे. मुख्य न्यायमूर्ती डीवाय चंद्रचूड आणि न्यायमूर्ती पीएस नरसिम्हा यांच्या खंडपीठाने बुधवारी पुढील सुनावणी ठेवली.

योगींनी संपूर्ण मंत्रिमंडळासह चित्रपट पाहिला

12 मे रोजी लखनौ येथील लोक भवन येथे द केरला स्टोरीचे स्क्रिनिंग आयोजित करण्यात आले होते, जिथे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी त्यांच्या मंत्रिमंडळासह हा चित्रपट पाहिला. एक दिवस आधी निर्मात्यांनी योगी यांची भेट घेतली होती. चित्रपटाचे निर्माते विपुल अमृतलाल शाह यांनी वृत्तसंस्थेला सांगितले होते - योगीजींनी चित्रपट करमुक्त करून आमचे मनोबल उंचावले आहे.

सीएम योगी यांनी शुक्रवारी 12 मे रोजी त्यांच्या मंत्रिमंडळासह द केरला स्टोरी पाहिला.
सीएम योगी यांनी शुक्रवारी 12 मे रोजी त्यांच्या मंत्रिमंडळासह द केरला स्टोरी पाहिला.

कथा हिंदू मुलींच्या धर्मांतरावर आधारित

द केरळ स्टोरी चित्रपट निर्माते सुदिप्तो सेन यांनी दिग्दर्शित केला आहे. हा चित्रपट त्याच्या कथेवरून वादात सापडला आहे. त्याच्या रिलीजविरोधातील प्रकरण सर्वोच्च न्यायालयात गेले. मात्र, न्यायालयाने चित्रपटाच्या प्रदर्शनाला रोखण्यास नकार दिला. चित्रपटाची कथा मुलींच्या धर्मांतरावर आधारित आहे.