आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अभिनेत्याची हत्या:'द किड्स आर ऑल राइट' फेम अभिनेता एडी हॅसेलवर गर्लफ्रेंडच्या घरासमोर गोळीबार, हॉस्पिटलमध्ये पोहोचण्यापूर्वीच मृत्यू

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • ‘द किड्स आर ऑल राइट’ या चित्रपटातील ‘क्ले’ या पात्राने त्याला विशेष ओळख मिळवून दिली.

हॉलिवूडचा 30 वर्षीय प्रसिद्ध अभिनेता एडी हॅसेलची अमेरिकेत गोळी झाडून हत्या करण्यात आली आहे. एडी हा टेक्सासच्या ग्रॅण्ड प्रेयरीमध्ये आपल्या गर्लफ्रेंडच्या अपार्टमेंटच्या बाहेर उभा असताना ही दुर्दैवी घटना घडली. या अभिनेत्याने कार चोरी करण्याऱ्या गुन्हेगारांचा निषेध केला तेव्हा चोरांनी त्याच्यावर गोळीबार केला. या गोळीबारात त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. स्थानिक माध्यमांच्या अहवालानुसार एडीच्या मॅनेजरने या घटनेची पुष्टी केली आहे.

सदर घटना रविवारी कार चोरीच्या उद्देशाने घडल्याचे त्यांच्या मॅनेजरने सांगितले. मात्र, अद्याप या घटनेचा तपास सुरू आहे. त्याच्या पोटात गोळी लागली होती. उपचारांपूर्वीच त्याची प्राणज्योत मालवली.

  • ‘द किड्स आर ऑल राइट’ ने दिली प्रसिद्धी

एडी हॅसेलचा जन्म 16 जुलै 1990 रोजी टेक्सासच्या कोर्सिकाना येथे झाला. 2000 आणि 2010च्या दशकात त्याने अनेक टीव्ही शो आणि चित्रपटांमध्ये काम केले. 2010 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘द किड्स आर ऑल राइट’ या चित्रपटातील ‘क्ले’ या पात्राने त्याला विशेष ओळख मिळवून दिली. 2011 च्या ऑस्कर सोहळ्यात ‘किड्स आर ऑल राइट’मधील त्याच्या भूमिकेने सर्वांची मने जिंकली. एनबीसीच्या विज्ञानावर आधारित शो ‘सर्फेस’मध्ये त्याने फिल नान्सची भूमिका केली होती. एडी हॅसेल याने हारून सॉर्किनच्या ‘स्टुडिओ 60 ऑन द सनसेट स्ट्रिप’, ‘जिमी किमेल लाइव्ह’, ‘ऑलिव्हर बेन्नेन’, ‘झोन ऑफ आर्केडिया’, ‘टील डेथ’, ‘साऊथलँड’, ‘बोन्स’ अशा बर्‍याच टीव्ही शोमध्ये काम केले होते.