आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सुशांतच्या वडिलांची प्रकृती बिघडली:दिवंगत सुशांत सिंह राजपूतचे वडील के.के. सिंह रुग्णालयात, प्रकृतीत होतेय सुधारणा

7 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • के के सिंह यांना हृदयविकाराचा त्रास आहे.

दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूतचे वडील के.के. सिंह यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. के के सिंह यांना हृदयविकाराचा त्रास आहे. त्यामुळे त्यांना हरियाणाच्या फरीदाबाद येथील एशियन रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सुशांतच्या वडिलांचा एक फोटो सोशल मीडियाद्वारे समोर आला आहे. या फोटोमध्ये ते रुग्णालयात दिसत आहेत. त्यांच्या दोन मुली प्रियांका आणि मीतू त्यांच्यासोबत आहेत.

हा फोटो सेलिब्रिटी फोटोग्राफर व्हायरल भयानीने त्याच्या ऑफिशिअल सोशल मीडिया अकाउंटवर शेअर केला आहे. हा फोटो समोर येताच सुशांतच्या चाहत्यांकडून केके सिंह यांची प्रकृती लवकर ठिक होण्यासाठी प्रार्थना करण्यात येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, के.के. सिंह यांची प्रकृती ठिक आहे.

14 जून रोजी केली होती सुशांतने आत्महत्या
सुशांत सिंह राजपूतने यावर्षी 14 जून रोजी मुंबईतील आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली होती. मात्र त्याची आत्महत्या नसून हत्या करण्यात आल्याचा आरोप त्याच्या कुटुंबीयांनी केला होता. त्यानंतर या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवण्यात आला होता. मात्र अद्याप सीबीआयकडून याप्रकरणी कोणताही मोठा खुलासा करण्यात आलेला नाही.

बातम्या आणखी आहेत...