आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निधन:'द लंच बॉक्स'च्या कास्टिंग डायरेक्टर सहर अली लतीफ यांचे कार्डिअ‍ॅक अरेस्टमुळे निधन, दोन्ही मूत्रपिंड निकामी झाल्याने रुग्णालयात करण्यात आले होते दाखल

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • सहर यांचे दोन्ही मूत्रपिंड संसर्गामुळे निकामी झाले होते

बॉलिवूडच्या लोकप्रिय कास्टिंग डायरेक्टर सहर अली लतीफ यांचे सोमवारी मुंबईत निधन झाले. 'द लंच बॉक्स' आणि 'दुर्गामती' सारख्या बर्‍याच चित्रपटांसाठी कलाकारांची निवड करणा-या हर यांचे दोन्ही मूत्रपिंड निकामी झाले होते. यानंतर त्यांना लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान हृदयविकाराच्या झटक्याने त्यांची प्राणज्योत मालवली. सहर यांच्या मृत्यूची बातमी समोर आल्यानंतर अनेक बॉलिवूड सेलेब्स आणि दिग्दर्शक सोशल मीडियावर पोस्ट शेअर करून त्यांना श्रद्धांजली वाहात आहेत.

सहर यांचे दोन्ही मूत्रपिंड संसर्गामुळे निकामी झाले होते
'मस्का'चे दिग्दर्शक उधवानी म्हणाले, "किडनी निकामी झाल्यामुळे आठ दिवसांपूर्वी सहरला लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांना मूत्रपिंडात संसर्ग झाला होता. त्यांना अँटिबायोटिक्स दिली जात होती आणि त्यांच्या प्रकृतीत सुधारण होत होती. मात्र उपचारादरम्यान रुग्णालयात त्यांना हृदयविकाराचा झटका आला आणि त्यांचे निधन झाले." सहार यांनी 'मस्का'साठी कास्टिंग डायरेक्टर म्हणून काम केले होते.

अनेक सेलिब्रिटींनी सहर यांच्या निधनावर शोक व्यक्त केला
राजकुमार राव, हुमा कुरैशी, अनुराग कश्यप, हर्षवर्धन कपूर, सान्या मल्होत्रा, नोरा फतेही, मसाबा गुप्ता, मानवी गगरू, शिबानी दांडेकर, रोहित सराफ, मिताली पालकर, निमरत कौर आणि मुकेश छाबरा या बॉलिवूड सेलिब्रिटींनी सोशल मीडियावर सहर यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

सहर अली लतीफ यांनी कास्टिंग डायरेक्टर म्हणून 'मिलियन डॉलर आर्म', 'द बेस्ट एग्झॉटिक मेरीगोल्ड हॉटेल', 'दुर्गामती: द मिथ', 'शकुंतला देवी', 'मॉन्सून शूटआउट' आणि 'द लंचबॉक्स' या चित्रपटांसह अनेक वेब सीरिजसाठीही काम केले होते.

बातम्या आणखी आहेत...