आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शूटिंग अपडेट:टायगर श्रॉफच्या 'हिरोपंती 2' च्या मुख्य अ‍ॅक्शन सीक्वेंसचे रशियात होणार चित्रीकरण, लार्जर दॅन लाइफ अ‍ॅक्शन सीन्सची असेल ट्रीट

14 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • या चित्रपटाची टीम पुढच्या महिन्यात रशियात सेंट पीटर्सबर्गमध्ये चित्रीकरण करणार आहे.

अहमद खान दिग्दर्शित साजिद नाडियाडवाला यांच्या आगामी 'हिरोपंती 2'ने मार्च महिन्यात मुंबईमध्ये एक छोटे शुटिंग शेड्यूल पूर्ण केल्यानंतर आता टीमने आपला मोर्चा रशियाकडे वळवला आहे. चित्रपटाचे दुसरे शुटिंग शेड्यूल रशियात पार पडणार आहे. टायगर श्रॉफ, तारा सुतारिया आणि नवाजुद्दीन सिद्दीकी स्टारर या चित्रपटाची टीम पुढच्या महिन्यात मॉस्कोमध्ये आणि त्यानंतर रशियात सेंट पीटर्सबर्गमध्ये चित्रीकरण करणार आहे.

'हिरोपंती 2'शी निगडीत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, "टीम मॉस्को आणि सेंट पीटर्सबर्गमध्ये चित्रपटातील प्रमुख अ‍ॅक्शन दृश्य आणि एका गाण्याचे चित्रीकरण करण्याची योजना बनवत असून तिथल्या स्थानिक टीमसोबत मिळून परफेक्ट लोकेशनचा शोध घेत आहे. शिवाय चित्रपटातील लार्जर दॅन लाइफ अ‍ॅक्शन दृशांना चित्रित करण्यासाठी अनेक स्टंट डिजाइनर्ससोबत बोलणे सुरु आहे ज्यामध्ये एक नाव सुप्रसिद्ध मार्टिन इवानो यांचे आहे, जे स्कायफॉल (2012), द बॉर्न अल्टीमेटम (2007) आणि द बॉर्न सुप्रमसी (2004) साठी ओळखले जातात."

सूत्रांनी पुढे सांगितले की, "रशियात जाण्याआधी सर्व क्रू मेंबर्सचे लसीकरण पूर्ण करण्याकडे साजिद काटेकोरपणे लक्ष देत आहेत." हिरोपंती या चित्रपटाद्वारे पहिल्यांदा नाडियाडवाला यांनी टायगर श्रॉफला धुव्वादार अ‍ॅक्शनसोबत जगासमोर आणले होते आणि आता हिरोपंती 2 मध्ये देखील चमकदार आणि स्टाइलिश अ‍ॅक्शनचा जलवा पहायला मिळणार आहे.'

बातम्या आणखी आहेत...