आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Entertainment
  • Bollywood
  • The Most Important Episode Of Aryan Khan Case Prateek Gaba Questioned For 7 Hours, NCB Can Call Again, No Clean Chit To Anyone At Present

ड्रग्ज प्रकरण:आर्यन खान प्रकरणातील सर्वात महत्त्वाचा दुवा असलेल्या प्रतीक गाबाची 7 तास चौकशी, NCB पुन्हा चौकशीसाठी बोलावू शकते, सध्या कोणालाही क्लीन चिट नाही

14 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • प्रतीक गाबाला क्लीन चिट नाही

आर्यन खान ड्रग्ज प्रकरणात एनसीबीने अद्याप कोणालाही क्लीन चिट दिलेली नाही. न्यायालयाने आर्यन खानच्या जामीन अर्जावरील सुनावणी 13 ऑक्टोबरपर्यंत तहकूब केली आहे. दरम्यान, एनसीबी आता न्यायालयात सादर करण्यासाठी आपला अहवाल तयार करेल. या प्रकरणातील सर्वात महत्त्वाचा दुवा असलेल्या प्रतीक गाबाला एनसीबी चौकशीसाठी पुन्हा समन्स बजावण्याची शक्यता आहे. यापूर्वीही प्रतीकची सुमारे 7 तास चौकशी करण्यात आली होती.

प्रतीक गाबाला क्लीन चिट नाही
राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी NCB वर आरोप केला आहे की, त्यांनी प्रतीक गाबा, आमिर फर्निचरवाला आणि ऋषभ सचदेवा यांना क्रूझवरून जाऊ दिले होते, परंतु NCB ने प्रतीक गाबाची 7 तास चौकशी केल्यानंतर त्यांचा अहवाल तयार केला आहे, जो ते न्यायालयात सादर करतील. गाबासह इतर दोन लोकांनाही क्लीन चिट देण्यात आलेली नाही.

प्रतीक गाबाच्या चौकशीत उघड झालेला तपशील एनसीबीच्या उच्च अधिकाऱ्यांनी उघड करण्यास नकार दिला आहे. अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की, आचारसंहितेमुळे आम्ही या गोष्टी सांगू शकत नाही, सर्व गोष्टी न्यायालयासमोर ठेवल्या जातील. अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की, क्रूझवरील छाप्यादरम्यान, ज्यांच्याकडून ड्रग्ज जप्त करण्यात आले नाहीत किंवा ज्यांनी ड्रग्सचे सेवन केले नव्हते, त्यांना अटक करण्यात आलेली नाही. पण, प्रत्येकजण तपास यंत्रणेच्या रडारवर आहे आणि एनसीबीने कोणालाही क्लीन चिट दिलेली नाही.

आर्यनला जामीन मिळाला नाही यामागे मोठे कारण असावे
अधिकारी म्हणतात की, आर्यन खानच्या बाबतीत आमच्याकडे काही असे पुरावे आहेत, ज्यामुळे त्याला या दहा दिवसांत दोनदा जामीन मिळालेला नाही. या प्रकरणात आर्यनचा सहभाग स्पष्टपणे आहे.

सर्वांच्या विरोधात तपास सुरू आहे

यासंदर्भात एनसीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांनी दैनिक भास्करला सांगितले की, प्रत्येकाच्या विरोधात तपास सुरू आहे, कोणालाही क्लीन चिट देण्यात आलेली नाही, जो कोणी घटनास्थळी होता, त्या प्रत्येकाविरोधात कायदेशीर कारवाई करण्यात आली. उल्लेखनीय म्हणजे गेल्या दोन वर्षांत समीर वानखेडे यांच्या नेतृत्वाखाली NCB ने 17,000 कोटी रुपयांचे ड्रग्ज जप्त केले आहेत.

प्रतीक गाबाने आपले सोशल मीडिया अकाउंट बंद केले
दरम्यान, प्रतीक गाबाने आपले सोशल मीडिया अकाउंट बंद केले आहेत. काही दिवस तो इंस्टाग्रामवर सक्रिय होता, पण आता त्याच्या पोस्ट किंवा त्याचा बायो इंस्टावर दिसत नाही. प्रतीक गाबाबद्दल सांगितले जात आहे की, आर्यन खान त्याच्या आमंत्रणावर क्रूझ पार्टीत सामील होण्यासाठी गेला होता आणि आर्यन, अंकित आणि प्रतीक गाबा हे तिघेही एकत्र मन्नतमधून बाहेर पडले होते. प्रतीक गाबा हा आर्यन खानचा मित्र असल्याचे सांगितले जाते.

बातम्या आणखी आहेत...