आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Entertainment
  • Bollywood
  • The Mumbai Court Issued A Bailable Warrant Against Actress Kangana Ranot, The Lyricist Had Filed A Criminal Complaint Against Kangana In 2020.

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

जावेद अख्तर मानहानी प्रकरण:अभिनेत्री कंगना रनोटविरोधात मुंबई कोर्टाने जामीनपात्र अटक वॉरंट जारी केले, गीतकाराने कंगनाविरोधात 2020 मध्ये फौजदारी तक्रार केली होती दाखल

2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • कंगनाने नऊ महिन्यांपूर्वी म्हटले होते की, जावेद अख्तर यांनी तिच्यावर हृतिक रोशनची माफी मागण्यासाठी दबाव आणला होता.

बॉलिवूड अभिनेत्री रनोट पुन्हा एकदा कायदेशीर अडचणीत सापडली आहे. गीतकार जावेद अख्तर यांच्या वतीने दाखल करण्यात आलेल्या मानहानी प्रकरणात मुंबईच्या अंधेरी महानगर दंडाधिकारी कोर्टाने कंगनाविरोधात जामीनपात्र अटक वॉरंट जारी केले आहे. चौकशीसाठी वारंवार पोलिस ठाण्यात बोलावूनदेखील हजर न राहिल्याने हे वॉरंट जारी करण्यात आले आहे. गेल्या महिन्यात कोर्टाने कंगनाला समन्स बजावले होते. या समन्समध्ये तिला जुहू पोलिस स्टेशनमध्ये हजर राहून चौकशीत सहकार्य करण्यास सांगण्यात आले होते. जावेद अख्तर यांनी नोव्हेंबर 2020 मध्ये कंगनाविरोधात फौजदारी तक्रार दाखल केली होती. एका मुलाखतीत कंगनाने जावेद अख्तर यांच्याविषयी भाष्य केले होते. कंगनाने आपल्या प्रतिमेला धक्का लावण्याचा प्रयत्न केल्याचे म्हणत जावेद अख्तर यांनी तिच्याविरुद्ध मानहानीचा दावा दाखल केला होता.

गीतकार जावेद अख्तर यांचे वकील जय कुमार भारद्वाज यांनी सांगितल्यानुसार, "गेल्या महिन्यात मुंबई पोलिसांनी जबाब नोंदवण्यासाठी कंगना रनोटला समन्स बजावले होते. परंतु ती हजर झाली नाही किंवा तिच्याकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही."

मुंबई पोलिसांनी कोर्टात सादर केला होता अहवाल
या प्रकरणात डिसेंबर 2020 मध्ये अंधेरी महानगर दंडाधिकारी कोर्टाने जुहू पोलिसांना जावेद अख्तर यांनी कंगना रनोट विरोधात दाखल केलेल्या मानहानीच्या तक्रारीची चौकशी करण्याचे निर्देश दिले होते. याच प्रकरणातील चौकशीनंतर जुहू पोलिसांच्या पथकाने 1 फेब्रुवारी रोजी कोर्टात अहवाल सादर केला होता. त्यात नमूद केले आहे की, तक्रारदाराच्या (जावेद अख्तर) तक्रारीवर पुढील तपास आवश्यक आहे. हा रिपोर्ट पाहिल्यानंतर दंडाधिकारी आरआर खान यांनी कंगनाविरोधात समन्स बजावले होते.

जावेद अख्तर यांनी कंगनावर लावले हे आरोप
जावेद अख्तर यांनी त्यांच्या वकिलांमार्फत 2 नोव्हेंबर रोजी तक्रार दिली होती. अख्तर यांनी अंधेरी येथील महानगर दंडाधिकाऱ्यांसमक्ष ही फौजदारी तक्रार केली असून कंगनाविरुद्ध भारतीय दंड विधानातील मानहानी संबंधी कलमांखाली कारवाई करण्यात यावी, अशी विनंती कोर्टाकडे केली होती. कंगना रनोटने माझ्याबद्दल निराधार वक्तव्ये केली असून यामुळे माझ्या प्रतिष्ठेला धक्का बसला आहे, असे अख्तर यांनी आपल्या तक्रारीत म्हटले. अभिनेता सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाशी संबंधित वादात कंगनाने माझे नाव नाहक ओढले, असा आरोपही अख्तर यांनी केला. हृतिक रोशन प्रकरणात माफी मागण्यासाठी घरी बोलावून दमदाटी केल्याचा धादांत खोटा आरोपही तिने माझ्यावर केला असून या सर्वाची गंभीर दखल घेत कंगनावर फौजदारी खटला चालवावा, अशी विनंती अख्तर यांना कोर्टाकडे केली. 3 डिसेंबर रोजी दंडाधिकारी न्यायालयाने जावेद अख्तर यांचा जबाब नोंदवला होता.

येथून सुरु झाला दोघांमध्ये वाद?
कंगनाने एका इंग्रजी वृत्तवाहिनीला दिलेली मुलाखत तसेच सोशल मीडियाच्या माध्यमातून बॉलिवूडवर गंभीर आरोप केले होते. घराणेशाहीमुळे बॉलिवूडची वाट लागली आहे. बॉलिवूडमध्ये माफियाराज पसरले आहे, असा आरोप कंगनाने केला होता. त्यात दिग्दर्शक महेश भट आणि जावेद अख्तर यांच्यावरही तिने गंभीर आरोप केले होते. हृतिक रोशन आणि कंगना रनोट यांच्यात मोठा वाद भडकला होता. या प्रकरणात बोलू नये म्हणून अख्तर यांनी माझ्यावर दबाव टाकला. मला हृतिक आणि त्याच्या कुटुंबीयांची माफी मागायला सांगितले. तसे केले नाही तर तुला ते जेलमध्ये टाकतील, अशी दमदाटी अख्तर यांनी केल्याचे कंगनाने मुलाखतीत जाहीरपणे सांगितले होते.

कंगनाची बहीण रंगोली हिनेसुद्धा सोशल मीडियावर असेच आरोप केले होते. त्यामुळेच अख्तर यांनी कायदेशीर पाऊल उचलले आहे. रंगोलीने सोशल मीडियावर दावा केला होता की, "जावेद अख्तर यांनी कंगनाला घरी बोलावले आणि हृतिक रोशनची माफी मागण्याची धमकी दिली. महेश भट्टच्या चित्रपटात सुसाइड बॉम्बरची भूमिका साकारण्यास नकार दिल्याने महेश भट्ट यांनी कंगनावर चप्पल फेकली होती. ते पंतप्रधानांना फॅसिस्ट म्हणतात .... चाचाजी तुम्ही दोघे काय आहात?", अशा आशयाचे ट्विट करुन रंगोलीने जावेद अख्तर आणि महेश भट्ट यांच्यावर निशाणा साधला होता.

बातम्या आणखी आहेत...