आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणात अमली पदार्थासंबंधित चॅट्स समोर आल्यानंतर एनसीबीने अभिनेत्री रिया चक्रवर्तीला अटक केली आहे. सध्या रिया भायखळा तुरुंगात आहे. दरम्यान एनसीबीच्या चौकशीत रियाने 25 बॉलिवूड सेलिब्रिटींची नावे घेतल्याचे वृत्त आले होते. बॉलिवूडमधील अनेक पार्टयांमध्ये ड्रग्ज घेतले जात असल्याचा खुलासा तिने केल्याचे वृत्त होते. इतकेच नाही तर रियाने अभिनेत्री सारा अली खान, रकुलप्रीत सिंग आणि फॅशन डिझायनर सिमोन खंबाटा यांच्या नावाचा देखील उल्लेख केल्याचे म्हटले गेले होते. पण आता अमली पदार्थविरोधी पथकाचे उपसंचालक केपीएस मल्होत्रा यांनी त्यांच्या टीमने अशी कोणतीही बॉलिवूड कलाकारांची यादी तयार केली नसल्याचे म्हटले आहे.
‘फ्री प्रेस जर्नल’ला अमली पदार्थविरोधी पथकाचे उपसंचालक केपीएस मल्होत्रा यांनी सांगितले की, ‘आम्ही बॉलिवूड कलाकारांची कोणतीही यादी तयार केलेली नाही. यापूर्वी तयार केलेली यादी ड्रग्स पेडलर आणि तस्करांची होती. त्यामुळे ती बाॉलिवूडची असल्याचा गोंधळ झाला.’
आतापर्यंत ड्रग्ज प्रकरणात 16 जणांना अटक
रिया चक्रवर्तीला एनसीबीने 8 सप्टेंबर रोजी अटक केली होती. दुसर्या दिवशी म्हणजेच 9 सप्टेंबर रोजी तिला भायखळा तुरुंगात हलवण्यात आले. रिया आणि शोविक यांच्यासह ड्रग्ज प्रकरणात आतापर्यंत 16 जणांना अटक करण्यात आली आहे. त्यापैकी केवळ एकाला जामीन मिळाला आहे. गेल्या दोन दिवसांत करमजीत सिंह आनंद, ड्वेन फर्नांडिस, संकेत पटेल, अंकुश अनरेजा, संदीप गुप्ता आणि आफताब फतेह अन्सारी यांना अटक करण्यात आली. आनंदवर ड्रग्ज सप्लायमध्ये सामील असल्याचा आरोप आहे. बॉलिवूडमधील काही लोकांशी त्याचे संबंध असल्याचे सांगितले जात आहे.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.